तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 July 2018

मुळा नदीच्या पुलावर बस उलटली; ३० प्रवाशी जखमी.


__________________________________

पुण्यातील वाकड येथे मुळा नदीच्या पुलावर एक प्रवासी बस उलटून भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून बस पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठी हानी टळली.एम.बी.लिंक ट्रॅव्हल्सची ही बस (एम एच ०९-सी व्ही, ३६९७ ) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. त्यावेळी वाकड येथील मुळा नदीच्या पुलाजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील जवळपास दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment