तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

पीक कर्जासाठी बँक व्यवस्थापकांनी केली शेतक-यांना पैशाची मागणी


शेतकऱ्यांनी दिला  तिफन बैलासह तहसीलमध्ये मुक्कामी राहण्याचा  इशारा
संग्रामपुर( प्रतिनिधी) राज्यसरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे.एकीकडे गेल्या चार वर्षांपासून पीक नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.व आत्महत्येकडे वळल्या जात आहे.अगोदरच शेतकरी सन्मान योजनेपासुन बहुतेक शेतकरी अद्याप वंचीत आहेत.ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना नविन पिककर्जासाठी बँक व्यवस्थापकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.अशीच घटना तालुक्यातील इटखेड पेसोडा गावातील शेतकऱ्यांबरोबर घडली.
त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांचेकडे जिल्हा सहकारी बँक पातुर्डा शाखेचे कर्ज होते.शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्यांना कर्जमाफीही झाली.त्यानंतर नविन कर्जासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे बँक व्यवस्थापक सुर्वे यांच्याकडे दिले व त्यांच्या खात्यात कर्ज जमा झाले म्हणून त्यांना ए.टी.एम. कार्ड ही दिले .परंतु शेतकरी पैसे काढण्याकरिता गेले असता खात्यात पैसेच जमा नव्हते. नंतर त्या सर्व शेतकऱ्यांनी दि.२ जुलै  रोजी बँक व्यवस्थापक सुर्वे यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता त्यांनी चक्क प्रत्येक शेतकऱ्यांकडे २००० रुपये द्या तरच तुमचे ए.टी.एम.कार्ड सुरू होईल असे सांगितले.
शेतकऱ्यांकडे यावर्षी पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत बँक कर्ज तर देत नाहीतच पण परत वरून अतिरिक्त पैशाची मागणी करतात.मग शेतकऱ्यांनी मरावं नाहीतर काय कराव. असा प्रश्न या शेतकऱ्यांनी केला.जर येत्या दोन दिवसात बँक व्यवस्थापकावर कारवाई करूण शेतकऱ्यांचे ए.टी.एम.चालु झाले नाहीत तर सर्व शेतकरी तिफन बैलासह दि.जुलै रोजी आपल्या संग्रामपुर तहसीलमध्ये मुक्कामाला येतील असा इशाराही देण्यात आला.यावेळी निवेदनावर महादेव मेहंगे,संतोष ईगंळे,पंढरी भिसे,पाडुरंग भिसे,नारायन भिसे,कैलास झाबरे,राजेश सुरळकार,निलेश सुरळकार,सह शेतकरी हजर होते

No comments:

Post a Comment