तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

मराठा आंदोलकांनी लातुरात नारायण राणेंचा पुतळा जाळला

लातूर:-लातूर येथील मराठा समाजाच्या बैठकीसंदर्भात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत लातूर मराठा क्रांतीने थेट नारायण राणे यांचा पुतळा जाळला. पुतळा जाळण्यापूर्वी पुतळ्यास आंदोलकांनी जोडेही मारले.

लातुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा क्रांतीच्या जिल्हा समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी मराठी समाजातील कांही प्रतिनिधींची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेली होती. त्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या सदस्यांचाही लातुरात निषेध करण्यात आलेला होता.

नारायण राणे यांनी वक्तव केले होते की, ‘लातूरची बैठक कोणी अ‍ॅथोराईज केली? सरकारने सांगितले का त्यांनी सांगितलेल्याच लोकांना बैठकीला बोलवा. लातूरच्या बैठकीतील लोकांना काही अधिकारी नाही, आम्हीही मराठा समाजाचे आहोत, आम्हाला अधिकार आहे, कायदे माहीत नसतील तर त्यांना माझ्याकडे येऊन शिकायला सांगा.’ या वक्तव्याचा तिव्र निषेध करीत लातूरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नारायण राणे यांच्या पुतळयास जोडे मारुन त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

No comments:

Post a comment