तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 18 July 2018

आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका

महादेव गिके
परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी केली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा परळीत काढण्यात आला असून, हा हजारोंचा मोर्चा परळी तहसील कार्यालयावर जाऊन धडकला आहे. यापूर्वी काढण्यात आलेले 58 मोर्चे हे मुकमोर्चे होते. परंतु आता तुळजापूर नंतर परळीत दुसरा मराठा क्रांती ठोक मोर्चा होत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून थेट राज्य सरकारला आव्हान देण्यात आले असून, आरक्षण मिळेपर्यंत परळी न सोडण्याचा निश्चय मोर्चेकऱ्यांनी केला आहे.

परळीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला आता सुरुवात झाली असून, तहसील कार्यालय प्रांगणात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुस्पहार अर्पण करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव परळीत दाखल झाले आहेत. राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असून, आरक्षणाच्या मागणीसह, सरकारने जाहीर केलेली नोकरभरती रद्द करावी अशी तीव्र मागणी होत आहे.

1 comment:

  1. आता मागे हटायच नाही...फक्त मराठा आरकषन

    ReplyDelete