तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

परळी तालुक्यात स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून ; अज्ञात महिलेवर खुनाचा गुन्हा


परळी : मौजे नागदरा येथील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत दि. २६ एप्रिल रोजी नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले होते. या दुर्दैवी बाळाला मारून विहिरीत फेकल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाल्याने या प्रकरणी अखेर आज (दि. ३१) रोजी अज्ञात महिलेवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

परळी तालुक्यातील नागदरा येथील पोलीस पाटील प्रकाश धोंडीराम नागरगोजे यांना दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावाजवळील तळ्यात खोदलेल्या शासकीय विहिरीत अंदाजे २-३ दिवसापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. त्या बाळाला पाण्यातील माश्यांनी आणि खेकड्यांनी हाता-पायाला कुरतडलेले होते. याची खबर नागरगोजे यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक सपकाळ यांच्याकडे होता. परंतु, सपकाळ यांची बदली झाल्याने पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्याकडे देण्यात आला होता. दि. ३० जुलै रोजी या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायावर चाटे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले आणि नवजात अर्भकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्यात टाकल्याप्रकरणी अज्ञात महिलेवर आज परळी पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

No comments:

Post a comment