तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

टुनकी खुर्द येथील डांबरीकरण रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची >जन अधिकार पार्टीची मांगणी 


संग्रामपुर[ प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी खुर्द येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले परंतु सदर डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दैनी अवस्था झाली असुन यात मोठ्या प्रमाणात भष्ट्रचार झाल्याचा आरोप करित सदर रस्त्याची चौकशी करुन संबंधीत कंत्रातदारावर कारवाई करण्यात यावी अशी मांगणी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन जन अधिकार पार्टी पदाधिकाऱ्यांनी केली आहे
निवेदनात नमुद आहे कि टुनकी खुर्द रस्त्याचे काम संबंधीत कंत्रातदारांने अपुर्ण काम केले असुन जे काम झाले त्यात मोठया प्रमाणात भष्ट्रचार झाला असुन निकृष्ठ दर्जाचे कामाची गुण नियंत्रक संबंधीत सा बा  विभागाकडून चौकशी करुन संबंधीत कंत्रातदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जन अधिकार पार्टी विदर्भ अध्यक्ष निखिल चौधरी , विदर्भ सचिव विशाल बावस्कार, युवा मंच जिल्हा प्रमुख सौरभ बावस्कार, जि उपाध्यक्ष अजय उकळकार,ता अध्यक्ष निलेश चोपडे, राजसिंग राजपुत, आदी जन अधिकारपार्टी पदाधिकारी सह टुनकी खुर्द ग्रामस्थानी दिला आहे 

No comments:

Post a Comment