तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

अंजनवाडी पाटी जवळ ट्रक व कार चा अपघात एक ठार तिन जखमी

अरुणा शर्मा

पालम :- पालम ते लोहा राज्य रस्त्यावर अंजनवाडी पाटी जवळ दिनांक 6 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. यात एकजण ठार झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. या बाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री एक कार लोहा कडून पालमकडे येत होती. अंजनवाडी जवळ या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. यात कारमधील चौघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान शेख युनूस शेख खुर्शीद वय 30 वर्ष याचा मृत्यू झाला. तर शेख वसीम, महंमद आजू व अन्य एक अशा तिघांवर उपचार सुरु आहेत. मृत शेख यूनूस हा युवक काँग्रेसचा गंगाखेड विधानसभा अध्यक्ष पदावर कार्यरत होता. या घटने मुळे गंगाखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment