तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 July 2018

रिसो च्या मदती ने वरुड नृसिंह येथे वाचनालय प्रारंभ

जिंतुर
आदर्श वरुड ग्राम विकास अभियान अंतर्गत विशेष उपक्रम

महा एनजीओ फेडरेशन चे कोअर कमिटी मेंबर व सामाजिक कार्यकर्ता श्री वैभव मोगरेकर  यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाने Riso  library
या संस्थेकडून  माझ्या गावी ( वरुड़साठी ) एक हज़ार पुस्तके व दोन कंप्यूटर मोफत मिळाली आहेत.

पुणे येथ श्री वैभव मोगरेकर यांच्या हस्ते ते स्विकारतांना गावचे सरपंच सरपंच प्रतिनिधी श्री रंगनाथ काळदाते

मागील चार महिन्यापासून चालू असलेल्या पाठपुराव्याला यश आले.

येत्या काळात आणखी दोन हज़ार पुस्तके मिळणार आहेत.
त्याची  सुसज्ज अशी लायब्ररी गावात तयार करण्यात येणार आहे याचा फायदा जिंतूर परिसरातील गावातील सर्व शेतकरी, शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले यांना अभ्यसासाठी व वाचना  साठी होणार आहे.
पुढील ग्रामीण विकासा च्या उपक्रमा विषयी श्री एस आर जोशी सर ( Persistent x VP) संचालक देअसरा फौंडेशन यांनी विशेष मार्गदर्शन केले
या पुढेही डिजिटल ग्राम पंचायत व ग्रामीण प्रशिक्षण विषयी कार्य सुरू राहील..
विजय वरूडकर
समनव्यक
महाएनजीओ फेडरेशन यांनी माहिती दिली
जाणीव झाली आता बदल घडवू या !!

No comments:

Post a Comment