तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 July 2018

विविध आजारांचे रुग्न उपचारा साठी मुंबईला रवाना ;आ फड यांचा स्तूत्य उपक्रम

प्रतिनिधी
पाथरी:-आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानत पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ.मोहनराव  फड मागिल काही महिण्यां पासून पाथरी मतदार संघातील गावागावात आरोग्य शिबिरे घेऊन यात विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्नांवर मुंबई येथिल डिवाय पाटील रुग्नालयात मोफत उपचार करत आहेत,शनिवार १४ जुलै रोजी विविध आजारांचे ६० रुग्न तपोवन एक्सप्रेस ने मुंबई येथे पाठवण्यात आले.
यांच्या वतीने आज दि.१४ जुलै रोजी पाथरी  मतदारसंघातील भोगाव साबळे, ईटाळी ,कुंभारी या गावातून मोती बिंदु३५, गर्भ पिशवी२,व इतर आजाराचे२३  असे रुग्ण एकूण ६० रूग्ण मुंबई येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई येथे मानवतरोड येथून तपोवन एक्सप्रेसने रवाना करण्यात आले.डॉ विजय पाटील व मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाशजी शेटे यांच्या सहकार्याने या रुग्णांवर उपचार होणार आहे या वेळी दशरथ भांड, सुरेश साबळे ,बाळासाहेब काळे, आरोग्य सेवक पप्पू नखाते ,परमेश्वर सोगे ,संजू खिलारे ,मुंजा चिंचाणे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment