तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

बायर कंनीच्या सुपरब बीजी २ कपाशीत मर रोगाचा प्रादुर्भाव;कंपनी वर कार्यवाहीची शेतक-याची मागणी

किरण घुंबरे पाटील

तालुका कृषी अधिका-यांना दिले निवेदन

पाथरी:-तालुक्यातील डाकू पिंप्री येथिल दोन शेतक-यांनी पाथरी शहरातील कृषी केंद्रावरून बायर कंपनीच्या सुपरब बीजी२ या कापुस बियानाची खरेदी करून ११ जुन रोजी पाण्यावर लागवड केली मात्र आता महिना भरानंतर या कंपनीच्या कापसाची झाडे आेळीच्या ओळी मर रोग लागून जळून जात असल्याने या शेतक-याने कापुस पिकाचा पंचनामा करून संबंधित कंपनीवर कार्यवाही करून नुकसान भरपाई मिळऊन देण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी, पाथरी. यांच्या कडे गुरूवार १२ जुलै रोजी निवेदना व्दारे केली आहे.
डाकू पिंप्री येथील शेतकरी नागोराव रावन महात्मे यांनी त्यांच्या गट क्रमांक ११५ मधील ३८ गुठे क्षेत्रा मध्ये सघन पद्धतीने बायर कंपनीच्या सुपरब बीजी२ या कपाशी बियानाची चारफुट अंतरावर लागवड केली आहे. तर गणेश दत्ता महात्मे यांनी गट क्रमांक ११५ मध्ये ५५ आर क्षेत्रात याच बियानाची ११ जुन रोजीच पाण्यावर लागवड केली असून या बियाण्याचा लॉट क्रमांक २४७२९००१०२ असा असून याच गट क्रमांकातील शेतात दोघां कडे ही इतर कंपनीच्या कापुस बियाणाची लागवड केलीली असून केवळ बायर कंपनीच्या वरील दोन्ही शेतक-यांनी लागवड केलेल्या कपाशीची झाडे आता मागिल काही दिवसा पासून सुकून जात वाळत आहेत त्या मुळे हे दोघे शेतकरी हताष झाले असून दोघेही अल्पभूधारक आहेत, या क्षेत्रातील कापसाच्या उत्पादनावरच त्यांचा वार्षीक घरगाडा चालतो मात्र आता बियाणे, खत, फवारणी, मजुरी, शेतमशागती साठी मोठा खर्च करून या शेतातील बायर कंपनीच्या वरील निकृष्ठ बियाण्या मुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून गुरूवारी या शेतक-यांनी बायर कंपनीच्या अधिका-यांना या विषयी माहिती दिली त्या नंतर देशमुख आणि भरोसे नामक अधिकारी यांनी या दोन्ही शेतक-यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहाणी केली या वेळी संबंधित शेत-यां सोबत जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात यांची ही उपस्थिती होती या वेळी या प्रकारा विषयी या अधिका-यांना विचारणा केली असता संबंधित प्रकार पाण्याचा मार बसल्याने झाल्याचे ते सांगतात मात्र यातील दोन्ही शेतकरी हे हे बियाणे पाण्यावर लागवड केलेले असून याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचे कापुस रोपटे जोमाने वाढत असल्याचे सांगत होते त्या वर आम्ही कंपनीला मेल पाठवतो असे चालढकलीचे उत्तर या अधिका-यांनी दिले. बायर कंपनीच्या वरील कापुस वानाची आमच्या शेतात येऊन पाहाणी करावी आणि या कंपणीवर कठोर कार्यवाही करून आम्हाला तात्काळव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी पाथरी यांच्या कडे निवेदना व्दारे केली आहे.
कंपनी वर कठोर कार्यवाही व्हावी-थोरात
गत वर्षी याच गावात अन्य एका कंपनीच्या कापुस बियाणाची उगवन न झाल्याची सामुहीक तक्रार शेतक-यांनी केली होती. या वर्षी ऊगवन झाल्या नंतर कपाशीची रोपे मरत असून या अशा बोगस बियाणे निर्मिती करणा-या कंपन्या वर प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी सोबतच शेतक-यांना नुकसान भप़रपाई मिळऊन द्यावी या साठी आपण स्वत:शेक-यां साठी प्रशासन दरबारी प्रयत्न करून या शेतक-यांना न्याय मिळऊन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक ,पाथरी पंचायत समितीचे सदस्य तथा जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी या वेळी पत्रकारांना बोलतांना सांगितले.
वर्षभर उत्पन्नाचे हेच साधन-महात्मे
या विषयी गहिवरून बोलतांना पिडीत शेतकरी नागोराव रावन महात्मे म्हणाले की साहेब मला एक हेक्टर एकोनविस आर जमीन असून यात काबाड कष्टकरून आम्ही पिक घेतो या शेताच्या ३८ गुंठ्यात सघन पद्धतीने ओळीचे अंतर चार फुट अंतर ठेऊन बायर कंपनीच्या वरील दोन बॅग लागवड केल्या असून आता कापसाची रोपे मरून जात असल्याने माझ्या उत्पादनावर आणि अपेक्षेवर पाणी फिरले असून या शेतात आता मी दुसरे पिक घेण्या साठी पैसा तरी कोठून आणार मला न्याय द्यावा अशी याचना या शेतक-याने केली आहे.

No comments:

Post a Comment