तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

घाटकोपर मध्ये अमली पदार्थ(ड्रग्स) च्या विक्रीचे आणि ते सेवन करून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले


मुंबई : दि.३१ कमी दिवसात जास्त पैशांच्या लालसेने काही समाजकंटक समाजात नशेचा व्यवसाय करतात. याला काही जण बळीही पडतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यात तरुणाईचा समावेश असल्याचे आढळून आले. चरस किंवा गांजा, ड्रग्स (हिरोइन) या सारख्या नशा उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची घाटकोपर मध्ये नशा विकण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे.यामुळे आयुष्याची होते राखरांगोळी
घाटकोपर मध्ये गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ(ड्रग्स) च्या विक्रीचे आणि ते सेवन करून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ही विक्री काही ठिकाणी अगदी खुले आम होत असताना घाटकोपर पोलीस ठाणे या बाबत कारवाई का करीत नाहीत?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे आता घाटकोपर मधील सामान्य जनतेमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे .अथवा घाटकोपर गुन्हेगारीचा अड्डा होण्याची शक्यता आहे.या अमली पदार्थ विक्री आणि ते सेवन करणाऱ्या गर्दुल्यांच्या विरोधात पोलिसानी कडक कारवाई करावी अशी येथील जनतेची मागणी आहे .

No comments:

Post a comment