तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 16 July 2018

चोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली

प्रतिनिधी
पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच पद्धतीने शटर तोडून फोडली असून या विषयी पोलीस पंचनामा सुरू असून नेमका मुद्दे माल किती गेला हे या विषयीची तक्रार दिल्या नंतर समोर येणार आहे.
पाथरी शहरात काल सकाळ पासून पावसाच्या सरी कोसळत होत्या त्या मुळे दिवस भर ग्राहकी नसल्याने व्यापार कमीच होता. रात्री ही पाऊस सुरूच होता. गेली संपपुर्ण पावसाळ्यात पहिलाच दमदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा होता त्या मुळे जेवण उरकले की सर्वजन निवांत झोपी गेले होते. याच संधीचा फायदा घेत मध्यरात्र ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधली आणि पाच दुकानांची शटर एक सारख्या पद्धतीने तोडून अथवा हुक अडकउन वाहना व्दारे ओढली असावीत असा ही कयास लावला जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव रोड लगत असल्या या पाच दुकानात गजानन कृषी केंद्र, श्री गणेश ड्रेसेस,कोमल प्रोव्हीजन्स, धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र, दिनेश कृषी सेवा केंद्र या दुकानांचा सामावेश असून एक किराणा आणि एक कापड दुकानाचा सामावेश असून तीन कृषी साहित्यांच्या दुकानाचा सामावेश असून चोरी झाल्याची बाब सकाळी उघडकीस आल्या नंतर पाथरी पोलीसांना याची माहिती देण्यात आली असून पाथरी पोलीस निरीक्षक श्रीमनवार आणि त्यांचे सहकारी या विषयी सहका-यां सह घटना स्थळी पोहचले असून पाहनी करून  पंचनामा करण्या चे काम सुरू आहे. यात कोमल प्रोव्हीजन्स आणि श्री गणेश ड्रेसेस यांचा माल जास्त चोरीला गेला असावा अशी चर्चा सुरू होती. या विषयी तक्रार नोंद झाल्या नंतर संपुर्ण माहिती समोर येणार आहे. चोरी झालेल्या ठिकाणी नागरीकांनी गर्दी केली होती. या पुर्वी याच भागात कृषी दुकान फुटल्याची घटना काही वर्षा पुर्वी झाली होती.

No comments:

Post a Comment