तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

अष्टपैलू व्यक्तीमत्व, परळी भुषण साहेबराव फड.

02 जुलै 1965 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पिंप्री घाट या ठिकाणी एका सामान्य शेतकर्‍याच्या घरात साहेबराव फड यांच्या जन्म झाला प्राथमिक शिक्षणाचे धडे गावातील शाळेत गिरविले प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन पुढील शिक्षणाची गोडी असल्यामुळे गावा जवळच असलेल्या उजनी या ठिकाणी माध्यमिकचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेवून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले परंतु हालकीच्या परिस्थितीने पाठलाग सोडला नव्हता शिक्षणाची तर मनामध्ये फार आवड होती परंतु परिस्थिती अशी होती की काम केल्या शिवाय उपजीविका भागणार नव्हती अशा परिस्थतीत स्वतःला सावरत हाताला मिळेल ते काम करण्याची तयारी केली व थेट लातूर जिल्ह्यातील अहमदपूर हे ठिकाण गाठले त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करु लागले काम करत असताना मनामध्ये शिक्षणाची आवड होती ती काही कमी झाली नाही अहमदपूर हे गाव लातूर जिल्ह्यातील शिक्षणांचे माहेरघर म्हणून ओळखले जात असे त्यामुळे शिक्षणाचा ध्येय वेडा हा नवतरुण त्या ठिकाणी काम करता करता शिक्षणाचे स्वप्ने रंगू लागला. परंतु परिस्थिती काही शिक्षण घेवू देत नव्हती अशातच कामाच्या शोधात भटकंती करत करत राजकीयदृष्टया प्रगत असलेल्या परळी शहरात 1984 च्या सुमारास दाखल झाले वडीलांच्या आशीर्वादाने परळीतील राजेसाहेब देशमुख यांच्या संपर्कात आले व त्यांच्या शिफारशीवर जगमित्र नागा मंदिर या ठिकाणी सेवा करु लागले या ठिकाणी पूर्ण इमानऐतबारीने सेवा केल्यामुळे राजेसाहेब देशमुख यांनी लिट्ल फ्लॉवर स्कुल या ठिकाणी सेवक म्हणून नेमणूक केली. मनातल्या शिक्षणाची आवड आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा करण्याची मिळलेली संधी या संधीचे सोने करत त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण इमानदारीने सेवा केली. मला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही माझ्यासारखे हाल इतरांचे होऊ नेय  हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण देखील एखादी संस्था उभारावी हा उद्देश घेऊन जगमित्राच्या आशीर्वादाने पहिली लिटल स्टार नावाची प्रिप्रायमरी शाळा सुरु केली. यामध्ये स्वतःला झोकून देऊन 1996 मध्ये ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था काढली व त्या माध्यमातून अभिनव विद्यालय नावाची शाळा माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडीतराव दौंड व संजय दौंड यांच्या मार्गदर्शनात तसेच राजेभाऊ जब्दे यांच्या सहकार्याने व आयुष्यामध्ये पावलो पाऊस साथ देणारी अर्धांगिनी सौ.गयाबाई फड यांच्या सोबतीने अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु केले आणि या ठिकाणीच आपल्यासारख्या आर्थिक परिस्थितीमुळे न शिकणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली विनाअनुदानित तत्त्वावर सुरु केलेली ही शाळा तब्बल पंधरा वर्ष स्वतः च्या हिमतीने व खर्चाने अनेक अडीअडचणींना तोंड देत आविरत सुरु ठेवले आज जवळपास 1400 विद्यार्थी पहिले ते दहावीच्या वर्गात सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातुन शिक्षण घेत आहे.

    त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत दैनिक मराठवाडा साथीने 2016 साली परळी भुषण या पुरस्काराने सन्मानित केले त्याच बरोबर महाराष्ट्रातील अव्वल नंबरचे दैनिक लोकमत यांनी 2017 मध्ये उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून औरंगाबाद या ठिकाणी सन्मानित करुन त्यांच्या कार्याची मोल देण्याचा प्रयत्न केला अशा शिक्षणप्रेमी व परिस्थितीला न जुमानता समर्थपणे सामना करणार्‍या अशा अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या परळी भुषण श्री.साहेबराव फड यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

No comments:

Post a Comment