तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

राज्य कबड्डी संघटनेच्या कबड्डी दिनाची परभणीत जोरदार तयारी 


परभणी दि. ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डीमहर्षी (कै.) शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी या कबड्डी दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्याची 
जबाबदारी परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनवर सोपवण्यात आली असून रविवारी (दि.15) दुपारी एक वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ व गौरव 
सोहळा होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने या कबड्डी दिनानिमित्त दरवर्षी या दिनानिमित्ताने कबड्डी क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ता, जेष्ठ पंच, जेष्ठ खेळाडू यांचा व कबड्डीच्या 
प्रसिध्दीसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या जेष्ठ पत्रकारांचा अमृत कलश देऊन गौरव करण्यात येतो. कबड्डी खेळ, खेळाडू आणि संस्था यांच्या विकासासाठी अमुल्य योगदान देणाऱ्या 
संघटकांचा कृतज्ञता पुरस्काराने या सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. 
त्याच बरोबर किशोर-किशोरी गट व कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सहभागी खेळाडू नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करून त्यांना (कै.) बाबाजी 
जामसांडेकर, (कै.) मुकूंद (अण्णा) जाधव व कबड्डी महर्षी (कै.) शंकरराव उर्फ बुवा 
साळवी यांच्या स्मरनार्थ रोख पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची (कै.) रामचंद्र पुनाजी चव्हाण व (कै.) सिताबाई रामचंद्र 
चव्हाणयांच्या स्मरणार्थ रोख अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन गौरव केला जाणार आहे. 

महिला व पुरुष गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईपटूस (कै.) मल्हारपंत बावचकर पुरस्काराने तसेच रोख पाच हजार रुपये पारितोषिक देऊन सन्मानित 
केले जाणार आहे. तर वरीष्ठ गटाच्या पुरुष व महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना (कै.) मधु पाटील पुरस्कार व (कै.) 
अरुणा साटम पुरस्काराने तसेच रोख दहा हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याच बरोबर (कै.) रमेश देवजी देवडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार, 
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा, कृतज्ञता पुरस्कार, राज्यात प्रथम क्रमांकावरील जिल्ह्याचा देखील या सोहळ्यात गौरव केला जाणार आहे. 
राज्य कबड्डी संघटनेने प्रथमच परभणी जिल्हा कबड्डी संघटनेकडे कबड्डी दिन आयोजनाची जबाबदारी सोपवली असून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश 
वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश जाधव, कोषाध्यक्ष  डॉ. भिमराव निर्वळ, सचिव मंगल पांडे आदी पुढाकार घेत आहेत. 

No comments:

Post a Comment