तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

दानवे-देशमुख यांच्यात रंगला राजकीय कलगितुरा

  राहुल देशमुख यांनी माईक हिसकावुन मांडली खरी परिस्थिती...

  प्रतिनिधी : भोकरदन

    भोकरदन शहरातील प्रताप नगर व जय भवाणी नगर मधील नविन रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमदार संतोष दानवे आले होते,तत्पुर्वी नगरपलीकेने नुकत्याच केलेल्या पाईपलाईन च्या पाहणी साठी युवक कॅाग्रेस चे विधासभा अध्यक्ष राहूल देशमुख त्याच काॅलनीत आले होते.आमदार साहेब आपल्या परिसरातील रस्ते उद्घाटनासाठी येनार असुन उर्वरीत प्रश्न आमदार साहेबांच्या कानावर घालन्या साठी आपन स्वत: कार्यक्रमात थांबावे असा आग्रह स्थानीक नागरीकांनी देशमुख यांना केला,परंतु कार्यक्रमाची रूपरेषा लक्षात आल्यावर देशमुख तेथुन काढता पाय घेत आसतांना काही उत्साही भाजप कार्यकरत्यांनी काॅलनी चे प्रतीनीधी म्हणून राहुल देशमुख यांच्या हस्ते आमदार संतोष दानवे यांचे स्वागत होणार असल्याची घोषणा केली.मंचावर सर्वच भाजप नेते आसल्याने युवक काॅग्रेस च्या देशमुख यांची चांगलीच अडचण झाली.
                पुढे कार्यक्रम सुरू झाल्यावर आपल्या भाषणात माजी नगराध्यक्षा आशाताई माळी यांनी माननीय आमदारांच्या प्रयत्नांतुन शहराच्या विवीध विकास कामांसाठी ११ कोटी रूपये मंजूर करून आणले असुन नगर परिषद ना-हरकत देत नसल्यामुळे विकास कामांत आडकाठी येत असल्याची टीका केली.आशाताईंच्या भाषणाचा सुर बघता राहूल देशमुख यांनी सुत्रसंचालकांकडे काॅलनीचा प्रतीनीधी आपल्यालाही भूमीका मांडण्यासाठी बोलू देण्यात यावे असा निरोप पोहचवला.उत्तरदाखल नियोजकांनी उर्वरीत सर्व भाषणे रद्द करत थेट संतोष दानवेंचे भाषण सुरू करत कार्यक्रम आटोपून घेण्याचा प्रयत्न केला व राहूल देशमुख यांच्या विनंतीला फाटा मारला.पुढे,आमदार संतोष दानवेनी आपल्या भाषणात नगरपरिषदेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली ते म्हणाले की,इतके वर्ष नगरपरिषद काॅग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असुन सुध्दा शहर विकासा पासुन वंचीत आहे.काॅलनी मध्ये भाजपच्या प्रयत्नातुन रस्त्याचे दबाईकरण व इतर कामे झाली झाली.नगरपरिषद ११ कोटींच्या विकास कामांत आडथळा आणत आहे,जनतेने नप निवडनुकीत विश्वास दाखवला असता तर शहराचा चेहरा-मोहरा बदलला असता,उर्दू पाट्या मुस्लीम समाजाचा विकास होणार नसल्याचे सांगीतले व नप च्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
           हा सर्व प्रकार बघून देशमुखांनी सुत्रसंचालकांकडून माईक थेट हीसकाऊन घेत आपण आभार प्रदर्शन करणार असलेयाचे जाहीर केले.
पुढे संतोष दानवेंना उद्देशुन ते म्हणाले काॅलनीतल्या ज्या कामांचा दाखला आपण दिलात ती कामे नप काॅग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना नगर पालिके मार्फत झाली आहेत.प्रताप नगर भागातील पाईपलाईन चा आपण स्वत:पाठपुरावा करत असुन,रस्त्यांचे इस्टीमेट तयार आहे ,पाईपलाईन झाल्यावर रस्ते करण्याचे पालिकेच्या विचारात होते पण सार्वजनिक बांधकाम विभाग घाईत हे रस्ते करत आहे पण रस्ते करत अस्यास स्वागतच आहे पण पाईपलाईन साठी हे रस्ते परत उकरावे लागणार असल्याने शक्यतो पाईपलाईन नंतरच रस्ते करण्याचे सुचवले.पथदिव्यांचे काम येत्या दोन महीण्यांत होणार असुन लवकरच परिसराचे मुलभूत प्रश्न सुटनार असल्याचे सांगीतले. ज्या ११ कोटींचा आपण दाखला देत आहात त्या पैकी ६ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर पालिके कडून पळवून नेला असुन त्यातूनच सदर कामे सुरू असल्याचे जाहीर करत आपण शहरा साठी ११ कोटीच काय ११०० कोटींचे कामे आणावे नप सहकार्यच करेल,नगराध्यक्षांची किंवा माझी भूमिका विकास कामात राजकारण करण्याची नाहीये असे सांगीतले.उरता उरला प्रश्न निधी आणण्याचा तर राजाभाऊ देशमुख नगराध्यक्ष असतांना त्यांच्या प्रयत्नांतुन माजी मंत्री राजेशभैय्या टोपेंनी हा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे ठणकावले.
         देशमुखांनी अचानक माईक हिसकाउन घेत अनपेक्षीत प्रतिसाद दिल्याने हा सर्व प्रकार सुरू असताना उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले पण भाजपा कार्यकर्ते्यांचा मात्र रंग उडाल्याचे दिसुन आले

No comments:

Post a Comment