तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 July 2018

तोष्णीवाल महाविद्यालया तर्फे एकदिवसीय व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:-येथील तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया तर्फे पुसेगाव येथील जीवन कला मंदीर येथे दि.04 जुलै बुधवार रोजी एकदिवसीय व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री.संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.के.सरनाईक होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.प्रशाला चे मुख्याध्यापक बेंगाळ सर व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डाँ.राजेश जोशी,प्रा.राजेश गोरे,प्रा.भगवान घुट्टे,प्रा.कुलदीप पवार तसेच डाँ.एस.एस.अग्रवाल,डाँ.पी.बी.पाटील,डाँ.यु.एल.साहु,डाँ.ए.ए.वाघमारे,डाँ.जी.पी.भालेराव,प्रा.आर.एस.जोशी,प्रा.एस.एस.जोशी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री.प.पु.पारनेरकर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.मार्गदर्शन प्रसंगी डाँ.राजेश जोशी यांनी 10 वी नंतर काय? या अनुषंगाने माहीती देत असतांना कला,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उपलब्ध संधीचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी देखील आपल्या अभिरुचीनुसार शाखेची निवड करावी असे सांगितले.प्रा.राजेश गोरे यांनी इंग्रजी ही अंतरराष्ट्रीय भाषा असुन तिचा अंगिकार करणे ही काळाची गरज गरज आहे यासाठी इंग्रजीचे परिपुर्ण ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी गरजेचे आहे असे सांगितले.प्रा.भगवान घुट्टे यांनी विज्ञान शाखेतुन कोनकोनते अभ्याषक्रम पुर्ण करता येऊ शकतात याची विस्तृत माहीती मांडली.प्रा.कुलदिप पवार यांनी विद्यार्थ्यांना शाखा निवडीचे पुर्ण स्वातंत्र्य असुन आपली आवड कोनत्या शाखेत आहे याचा विचार करुनच त्याची निवड करावी.कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.के.सरनाईक यांनी व्यवसाय मार्गदर्शन ही स्पर्धात्मक काळाची गरज असुन महाविद्यालयाने नि:शुल्क शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले.याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करुन अशा प्रकारचे शिबिरे वारवारं घ्यावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल असे सांगितले.या कार्यक्रमामध्ये 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डाँ.डी.एस.धारवाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.आर.एस.सबनिस यांनी केले.

No comments:

Post a Comment