तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 July 2018

जिजामाता कन्या विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहाने साजरी

नाशिक (उत्तम गिते(

वृक्षसंवर्धन व संगोपन उपक्रम  देशभरात उत्साहाने साजरा करण्यात  येत आहे ,त्या अनुषंगाने जिजामाता कन्या विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत .त्या अंतर्गत वृक्ष संवर्धन -काळाची गरज या विषयावर विद्यार्थिनींची व्याख्यान  माला सुरू आहे .तसेच विद्यार्थिनींनी पारंपारिक  वेशभूषा करून विद्यालयात वृक्षप्रतिद्न्या घेऊन वृक्षदिंडीचे आयोजन केले .त्यातून वृक्षांचे महत्त्व व गरज यावर जनजागृती केली तसेच 'बाय-बाय प्लास्टिक ' , 'पाणी  वाचवा' यांविषयी चित्ररुपातून आणि घोषणांतून परिसरात प्रबोधन केले .यात विद्यालयातील हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला .   या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री नानासाहेब पाटील  ,सचिव श्री संजय पाटील  ,उपाध्यक्ष श्री  निवृत्ती गायकर ,श्री शंतनू पाटील  ,मुख्य कार्यकारी अधिकारी  सौ वैष्णवी पाटील यांची  प्रमुख  उपस्थिती  होती .विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लता जाधव ,पर्यवेक्षक श्री बाबासाहेब  गोसावी  ,हरित सेना प्रमुख  श्रीमती आरती गायकर  ,श्रीमती शारदा केदार आणि विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी  यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
उत्तम गिते
8830642019
नाशिक जिल्ह्यातील बातमी व जाहिरातीसाठी वरील नंबर वर संपर्क करा

No comments:

Post a Comment