तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

कस्तुरबा गांधी विद्यालयात मुलींना शालेय साहित्याचे वाटप करत टेंगसे यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी
पाथरी:- परभणी जि प चे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे यांचा वाढदिवस १०जुलै रोजी पण टेंगसे यांनी या पुर्वी कधीच आपला वाढदिवस साजरा केला नाही साजरा करणे आवडत नाही. असे सांगितले जाते या वेळी त्यांच्या सुविद्य पत्नी परभणी जि प च्या विद्यमान सदस्या सौ.मिराताई टेंगसे यांनी पती टेंगसे यांचा वाढदिवस आगळ्या पद्दतीने सामाजिक उपक्रम साजरा करत वाडी,वस्ती,तांड्यावरील गरीब मुलींना शिक्षणा साठी मदत करून साजरा करूयात अशी  संकल्पना मांडली आणि याला मुर्त रूप देत ती शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात मुर्त रुपाला आणली गेली या ठिकाणी शिक्षणा साठी असलेल्या आणि परिस्थितीने शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या या मुलींना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गोरगरीब, कष्टकरी, ऊसतोड,वाडीवस्ती,तांडावर च्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिस साजरा झाला टेंगसे दाम्पत्याला मुलीबद्दल अत्यंत जिव्हाळा, त्यांनी आपल्या दोन्ही मुली उच्यशिक्षित करून एक आदर्श निर्माण केला आहे. मोठी मुलगी फूडटेक,एम टेक करून मोठ्या पदावर कार्यरत आहे. तर छोटी मुलगी एम टेक फूड चेन्नई येथे पूर्ण करून चॉकलेट कंपनी मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे.मुलगी म्हटलं की जास्त शिकू देत नाहीत पण टेंगसे दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुली उच्चशिक्षित करून मुलगी असून चेन्नई ला शिकायला ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.मुलगा सुद्धा एमबीए करत आहे.मुलिंनीनशिकावं मोठं व्हाव मुलांच्या बरोबरीने राहाव ही त्यांची शिकवन, त्या मुळे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींना खूप शिका मोठे व्हा तुम्हाला कधी काहीही अडचण आली तर निःसंकोच पणे संपर्क करा मी आम्ही तुमच्या साठी मदत करायला तयार आहोत असे मुलींना सांगून त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला.या वेळी आपला वाढदिवस या बालिंकां सोबत साजरा झाला याचा आनंद आणि समाधान टेंगसे यांनी व्यक्त केले या प्रसंगी सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सदस्या जि.प.परभणी , राजेश ढगे सभापती प.स.पाथरी, नारायनराव आढाव संचालक कृ.ऊ.बा.पाथरी,अजय थोरे सदस्य प.स.पाथरी, आबा आंबट,खोगरे गट शिक्षणाधिकारी पाथरी,रोहिदास टेंगसे,संजय उजगरे,चिंचाने व सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment