तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

भावोजी झाले ट्रॅफीक हवालदार, भरपावसात केली वारकऱ्यांची सेवा.


____________________________________

भावोजी या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर काल दिवे घाटात ट्रॅफीक हवालदाराच्या भूमिकेत पाहायला मिळाले…चित्रपट, टीव्ही सिरीयल, राजकारण आणि समाजकारणात आदेश बांदेकर यांचा दबदबा आहे पण काल त्यांचं वारकऱ्यांच्या मदतीसाठी भर पावसात धावून जाणं अनेकांना भावलं…त्याच असं झालं भावोजी एका शो च्या शूटच्या निमित्ताने दिवे घाटात गेले होते. दरम्यान, पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालख्या या  घाटात पोहचल्या, संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी जाम झाला. घाटात अडकलेल्या वारकरी भाविकांना पुढेही जाता येईना आणि मागेही…वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडू लागले.पावसाची रिपरिप आणि खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आबालवृद्ध बेहाल झाले. वारकऱ्यांचे हाल पाहून भाऊजी पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागले.वारकऱ्यांना हात जोडून एका बाजूने चालण्याससांगून मोठ्या गाड्यांना रस्ता करून दिला. पावसाची तमा न बाळगता, आपण सेलिब्रेटी आहोत. शिवसेनेचे नेते आहोत. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्य मंत्रीपदाचा दर्जा… सारे काही विसरून आदेश बांदेकर ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत शिरले.वाहतुकीच्या सूचना देणारे पोलीस नसून आपले लाडके भाऊजी आहेत आणि ते आपल्याला विनंती करीत आहेत म्हटल्यावर वारकऱ्यांनी हसतमुखाने त्यांच्या सूचनांचे पालन केले. पावसाची तमा न बाळगता दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या सच्चा शिवसैनिकाची मूळ भूमिका वठविणारे भावोजी मात्र सगळ्यांच्या कौतुकाचे धनी ठरले.

No comments:

Post a Comment