तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

गेवराई : दुचाकीच्या डिग्गीतून दिड लाख रुपये लंपास

सुभाष मुळे...
=======
गेवराई, दि. 4 ( वार्ताहर ) येथील सेल्समन संजय देशपांडे यांच्या दुचाकीच्या डिग्गीतील दीड लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दि. 4 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील जातेगाव फाट्याजवळ घडली आहे.
     संजय देशपांडे हे, बुधवारी काही कामानिमित्त दुचाकीवरून जातेगाव फाट्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या डिग्गीत दीड लाख रुपये होते. गाडी पार्क करून ते बाजुला गेल्याचा फायदा घेत, अज्ञात चोरटय़ांने दीड लाख रुपये लंपास केले. पैसे चोरी गेल्याचे समजल्यावर त्यांनी शोधाशोध केली परंतू काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी संबंधित घटना गेवराई पोलिसांना कळविली व तक्रार केली. पोलिसांनी घटनेची नोंद करून , गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे तपास करीत आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स'आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment