तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

गुजरातमध्ये ६,६९० हिरेजडित कमळाची अंगठी, विश्वविक्रमाला गवसणी.


आपण साखरपुड्यात जी अंगढी पाहतो ती सर्वसाधारणपणे एक-दोन हिऱ्यांची असते.पाच ते सहा हिऱ्यांची अंगठीही आपण कदाचित पाहिली असेल. पण आम्ही तुम्हाला अशा एका अंगठीबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. म्हणूनच त्या अंगठीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय. हा अंगठीनामा जगात इतर कुठे झाला नाहीए तर भारतातच गुजरात मध्ये झालायं. इथे चक्क ६,६९० हिऱ्यांची अंगठी बनलीयं. या अंगठीच जगभरातून कौतूक होतयं. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे या अंगठीचा व्हिडिओ नुकताच फेसबुकवर शेअर करण्यात आला आणि बघता बघता या व्हिडिओला चार लाखाहून अधिकव्ह्यूज मिळाले.

६,६९० हिऱ्यांची अंगठीला कमळाचा आकारा देण्यात आलायं. या कमळात दहा-बारा नव्हे तर ४८ हिरेजडीत पाकळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. वरकरणी पाहता हे उमलणारं कमळं दिसतयं. रोझगोल्ड मध्ये अठरा कॅरेटमध्ये ही अंगठी करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. हे सर्व साकारण्यासाठी त्याला ६ महिन्यांचा कालावधी लागलाय.

No comments:

Post a Comment