मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 4 July 2018

भाजप नगरसेविकेच्या पतीचा चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार.


देवरूख मध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीने चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केला. यामधून गर्भवती राहिलेल्या तरुणीने बुधवारी बाळाला जन्म दिला. सेन्ट्रीग कामात मदत करण्यासाठी ठेवलेल्या तरुणीवर बलात्कार करत तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीविरुद्ध शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९ महिन्यापूर्वी भाजप नगरसेविकेचा पती अनंत पाताडे याने चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रार तरूणीने पोलिसांकडे दिली आहे. नऊ महिन्याची गरोदर असलेल्या तरूणीला प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीची प्रसुती सुखरूपपणे झाली आहे. कुमारी मातेच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अनंत पाताडे याच्या विरूध्द भा.द.वि.क.३७६अन्वये गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा देवरूख पोलिसांकडे झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने देवरुखात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment