मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 3 July 2018

ग्रॅण्ट रोड स्थानकावरून जाणाऱ्या पुलाला तडे, वाहतूक थांबवली.


अंधेरी स्थानकाजवळील पूल कोसळून झालेली दुर्घटना ताजी असतानाचा ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पूलालादेखील तडे गेल्याचे समोर आले आहे. या पुलावरील वाहतूक पोलिसांनी तात्काळ थांबविली आहे. पुलाच्या मध्यभागीच मोठा तडा गेल्याचे वेळीच निदर्शनास आल्यामुळे अंधेरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली. विशेष बाब म्हणजे हा पूल देखील रेल्वेच्या ट्रॅकवरूनच जातो.गिरगावमधील नाना चौक ते लॅमिंग्टन रोड या पुलाने जोडले गेले आहेत. या पुलाला तडे गेल्याचे आज सकाळी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील वाहतूक थांबवून ती केनेडी पुलावरून वळविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.मंगळवारी अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा पादचारी भाग रेल्वे रुळावर कोसळला. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले. हा पूलकोसळल्याने रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटल्या. परिणामी तब्बल १२ तास या मार्गावरील वाहतूक बंद ठप्प होती.

No comments:

Post a Comment