तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 July 2018

मुलांनाबाहेर काढण्यासाठी खडतर बचाव मोहीमेला सुरूवात.


________________________________

थायलंड मधल्या सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या १२ मुलांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीमेला सुरूवात झाली असून पुढील काही तासांत या मुलांना गुहेबाहेर काढण्याचं मोठं आव्हान सिल कमांडो समोर असणार आहे. या बचाव मोहीमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून, ही मुलं सुखरूप बाहेर यावी यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहे. गेल्याच आठवड्यात या मोहीमेत सहभागी झालेल्या माजी थाय सिल कमांडोचा गुदमरून मृत्यू झाला होता.त्यामुळे या बचाव मोहीमेत मोठा धोका असणार आहे. निसर्ग आणि वेळेचं मोठ आव्हान या मुलांसमोर आहे. येत्या काही दिवसांत येथे अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे आताच या मुलांना बाहेर काढलं नाही तर ऑक्टोबरपर्यंत मुलांना आतच राहवं लागेल. कदाचित गुहेतील पाण्याची पातळी वाढून या मुलांचा जीवही जाऊ शकतो म्हणूनच या मुलांना बाहेर काढण्याचा अखेरचा प्रयत्न सुरू आहे.चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत१५ दिवसांपासून फुटबॉल टीम अडकली आहे. या टीममध्ये ११ ते १६ वयोगटातील १२ मुलं आणि त्यांचा २५ वर्षांचा प्रशिक्षक देखील आहे. थाय अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी बचाव मोहीमेला सुरूवात झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. या मुलांना कशाप्रकारे बाहेर काढता येईल याची पूर्ण माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोहोत गुहेबाहेर येण्यावाचून या मुलांकडे कोणताही पर्याय नाही. यातल्या एकाही मुलाला पोहोता येत नाही त्यामुळे या मुलांना पोहोण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. आता या खडतर प्रवासाला सुरूवात झाली आहे.

No comments:

Post a Comment