तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

दिनकर नळणीकर यांना तुकडोजी महाराज निर्मल ग्राम प्रबोधन पुरस्कार

गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)
---------------
स्री भ्रुण हत्या, बालविवाह, हुंडाबळी थाबवणे. पर्यावरण, व्यसनमुक्ति, स्वच्छ भारत अभियान यासह शासकिय योजनांसोबतच सामाजिक कार्याची जाणीव व जाग्रुती करणारे लोककलावंत दिनकर नळणीकर रा.केदारखेडा (ता.भोकरदन) यांना शाहीरी व लोककला क्षेत्रात कार्य करणार्या मानव सेवा कलापथक संस्थेच्या वतिने देण्यात येणारा मराठवाडा विभागीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मल ग्राम प्रबोधन शाहीर रत्न पुरस्कार नुकताच प्रसिध्द ग्रामिण कवि श्री.त्रिंबकदादा बरकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दि.५ जुलै २०१८ रोजी केदारखेडा येथे स्वरधारा कार्यालयात जेष्ट लोककलावंत शाहीर गुलाबराव नळणीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment