तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

नरेंद्र मोदीजींनी देशातील शेतक-यांचा सन्मान वाढवला - ना. पंकजाताई मुंडे

मुंबई दि. ०४ ---- खरिपातील प्रमुख चौदा पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम शेतक-यांचा सन्मान वाढवला आहे अशा शब्दांत ट्विट करून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे केले आहे.

   केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या नवीन दरवाढीला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रातल्या ज्वारी या पिकाला सर्वाधिक भाववाढ मिळाली आहे त्यापाठोपाठ तूर, मुग आणि उडीदाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. सरकारनं प्रतिक्विंटल दोनशे रूपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंत भाववाढ जाहीर केली आहे, सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असून देशातील शेतक-यांचे आर्थिक जीवनमान यामुळे उंचावणार आहे, त्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्याबरोबरच पंतप्रधानांनी त्यांना खरा न्याय मिळवून दिला असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

आर्थिक क्रांती घडविणारा निर्णय  - खा. डाॅ प्रितमताई मुंडे
-------------------------
हमीभावात दीडपटीने वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना दिलेला शब्द पाळला आहे. शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारा हा निर्णय आहे अशा शब्दांत खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी याचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातल्या शेतक-यांचे शिष्टमंडळ घेवून खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांनी नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांनी शेतक-यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेवू असे म्हटले होते, त्यामुळे दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment