तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

जिवनात खिलाडूवृत्ती आनंदाचे सुत्र आहे - पनि सोपान सिरसाठ


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : खेळामध्ये संघाच्या प्रत्येकाची एकजुट करून जींकण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. तसेच जिवनात आनंदी होण्यासाठी खिलाडू  वृत्ती ठेवल्यास जीवन आनंदी बनते ते आनंदी जीवनाचे सुत्र आहे,  असे मत पोनि. सोपान सिरसाठ यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सिने अभिनेत्री वर्षा कांबळे या उपस्थित होत्या.
जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री बळीराम  काटे  तसेच मंडळातील पदाधिकारी गणेश आडकीने यांच्या वाढदिवसानिर्मित भव्य जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा सोनपेठ पोलीस स्टेशन च्या मैदानावर पार पडल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बळीराम काटे  कार्यक्रमाचे उद्घाटक सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ होते, या स्पर्धेत जील्ह्यातील वीस संघ सहभागी झाले होते. प्रथम पारितोषक विजेता जाणता राजा कब्बडी संघ परभणी,  द्वितीय पारितोषक सरकार वॉरियर्स सोनपेठ,  तृतीय पाथरी नगर परिषद संघ पाथरी यांनी पटकावले. सामने अतिशय अटीतटीचे झाले. यावेळी पंच म्हणून रविकुमार स्वामी, मदनराव कांबळे, तालुका क्रीडा अधिकारी सुमित लांडे, देशपांडे,  सुजीत माळी नवघरे , यांनी काम पाहीले.
यावेळी सपोनि. पवार,  पोहेकॉ. अनिल शिंदे, मुख्याध्यापक राजकुमार धबडे पत्रकार गणेश पाटील, विकास फपाळ, दत्तात्रय गव्हाणे,  राजेश खेडकर, बालचंद शिंदे, डिघोळचे सरपंच गोकुळ आरबाड, क्रिडाशिक्षक गोविंद वाकणकर, प्रा. डॉ. संतोष रणखांब यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्र संचालन ओमप्रकाश लष्करे, आभार बळीराम काटे यांनी मांनले.

No comments:

Post a Comment