तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 July 2018

पिकविम्या साठी आ भांबळे,आ केंद्रेंची विधान भवना समोर घोषणाबाजी

किरण घुंबरे पाटील

नाकपुूर/परभणी:-विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याला आज पासुन प्रारंभ झाला असुन विधिमंडळाचे कामकाज सुरू असतांना विधान भवना समोरील पाय-यांवर जिंतूर चे आ विजयराव भांबळे आणि गंगाखेडचे आ मधूसुदन केंद्रे,आ भाऊसाहेब पाटील, आ दत्तात्रय भरणे यांनी परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना पिकविमा मिळावा या साठी हातात फलक घेऊन घोषणा बाजी करत रिलायन्स कंपनी वर गुन्हा दाखल करण्याची घोषणा देत जोरदार मागणी केली.
परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना रिलायन्स कंपनीने गत वर्षीचा खरीप हंगामातील पिकां साठीचा पिक विमा द्यावा या साठी मागिल काही दिवसा पासून परभणी जिल्ह्यात राजकिय पक्ष,सामाजिक संघटना आणि शेतकरी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गांने आंदोलन करत असून या साठी परभणी येथे शेतकरी कृती समिती बेमुदत आंदोलन करत असून आता या विषयी जिंतूर चे आ विजयराव भांबळे आणि गंगाखेडचे आ मधूसुदन केंद्रे, आ भाऊसाहेब पाटील, आ दत्तात्रय भरणे यांनी आज नागपुर विधानभवना समोर परभणी जिलिह्यातील शेतक-यांना पिकविमा द्यावा या साठी हातात फलक घेऊन रिलायन्स कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून सरकार या विषयी कोणती भूमीका घेते या कडे परभणी जिल्ह्यातील शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

2 comments: