तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

जानेफळ येथील पुलाचे काम नोकृष्ठ दर्जाचे... पहिल्याच पावसात पूल गेला वाहून.

गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)
---------------
भोकरदन ग्रामीण : केदारखेडा येथून जवळच असलेल्या जानेफळ दाभाडी येथील मुख्य रस्त्यावर तीन महिन्यांपूर्वी नवीन पुलाचे काम करण्यात आले होते. परंतु तो पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे.
चिंचोली फाटा ते जवखेडा रस्त्यावर जानेफळ नाल्यावर लाखो रुपये खर्च करून नवीन पुलाचे काम करण्यात आले. परंतु, ते काम संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी न करताच कंत्राटदाराला कामाची बिले अदा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी व पुलाची नव्याने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment