तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

पत्रकारांच्या हितासाठी लढत राहणार -एस.एम. देशमुख 


संपादक, पत्रकारांच्या उपस्थित पत्रकार परिषदेची बैठक 
महादेव गित्ते
---------------------------------
बीड , दि.12
पत्रकारांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी आपण एक लाखांची नौकरी सोडली. मी मला वैयक्तीक कधीच काही माघत नाही. सरकारला भांडतो तो केवळ पत्रकारांच्या हितासाठी. पत्रकार हल्लाविरोधी कायदा सभागृहात मंजूर झाला. राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर होईल. पत्रकार पेंशनचा लढा देखील आपणच उभा केला होता. त्याला देखील यश आले आहे. हे यश माझे एकट्याचे नाही तर सर्व पत्रकारांचे आहे. मी कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत पडत नाही.  ज्याला घ्यावयाचे आहे त्यांने खुशाल घ्यावे. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही मी लढतच राहणार अशी ग्वाही मराठी पत्रकार परिषदेेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी दिली. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बैठक व सत्कार सभारंभात ते बोलत होते. 
यावेळी व्यासपिठावर नामदेव क्षीरसागर, आशोक देशमुख, गंमत भंडारी, दिलीप खिस्ती, अनिल महाजन, सुभाष चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला मार्गदर्शन करतांना एस.एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेचे राज्यभरातील कार्य सांगून काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. पत्रकारांना शासनाने पेंशन मंजुर केली. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आपण सरकारकडे लावून धरली होती. ती मंजुर झाल्याने मला मनस्वी आनंद होत आहे. मी पेंशनच्या चौकटीमध्ये बसत आसलो तरी पेंशन स्वीकारणार नाही. असे सांगतानाच या पेंशनमुळे अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे.  मी पत्रकारांच्या हितासाठीच काम करत असल्याने भविष्यात जिल्हा दैनिक जगली पाहिजेत. त्यांना शासनाकडून मिळणार्‍या जाहिरातीमध्ये वाढ झाली पाहिजे. या महत्वाच्या प्रश्‍नासाठी 15 ऑगस्टला राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी म्हणाले की, एस.एम संपादकांच्या बाजुने आहे. तर त्यांना खुशाल म्हणू द्या. मला काळजी आहे. त्या दैनिकामध्ये काम करणार्‍या उपसंपादकांपासून ते पार्सलबॉयपर्यंतच्या कर्मचार्‍यांची. त्यामुळे पत्रकारांसाठीच आपण लढत आलो. आणि कायम लढत राहणार. त्यांना न्याय देण्यासाठीच माझा लढा आहे. असेही ते शेवटी म्हणाले. यापूर्वी जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, गंमत भंडारी, आशोक देशमुख, दिलीप खिस्ती, जगदीश पिंगळे, अनिल महाजन, सुभाष चौरे, महेश वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 या बैठकीला विशाल साळुंके, विलास डोळसे, दत्ता आंबेकर, राजेंद्र आगवान, सर्वेत्तम गावरस्कर, नरेंद्र कांकरिया, विश्‍वनाथ मानुसमारे, उत्तम हजारे, अनिल मगर, बालाजी तोंडे, दिनेश लिंबेकर, श्रावण जाधव, परमेेश्‍वर गिते, संतोष जोगदंड, राजेश खराडे, प्रदिप मुळे, प्रदिप राठोड, दत्ता नरनाळे, प्रकाश काळे, नागनाथ सोनटक्के, सय्यद शाकेर, पोपट कोल्हे, अविनाश कदम, जगन्नाथ परजणे, सय्यद अलताफ, जुनेद बागवान, हारिष यादव, सय्यद कौसर, गजानन मुडेगावकर, सुनिल क्षीरसागर, दगडू पुरी, मुकेश झनझणे, केशव कदम, रविंद्र भालेकर, उत्तम ओव्हाळ, उदय जोशी, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, संजय हांगे, सोमनाथ सोनटक्के, अनिल अष्ठपुत्रे, लक्ष्मण नरनाळे, किसन माने आदींसह मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे तर सुत्रसंचालन विशाल साळुंके यांनी केले. आभार सय्यद शाकेर यांनी मानले. 

हे यश सर्व पत्रकारांचे 

पुर्वी पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजुर झाल्यानंतर अनेकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न आताही होत आहे. परंतु, मी आजपर्यंत कधीच पेंशन केवळ माझ्यामुळे मिळणार हे म्हणालो नाही. हे यश राज्यातील संपुर्ण पत्रकारांचे आहे. पत्रकारांना पेंशन मिळावी ही मागणी सोलापुर पत्रकार भवनाच्या भुमिपुजन कार्यक्रमावेळी तात्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. ही मागणी सातत्याने लावून धरली व त्याला आज यश मिळाले. असे देशमुख म्हणाले. 

संपादकांच्या वतीने देशमुखांचा सत्कार 

पत्रकारांसाठी नौकरी त्याग करून लढणारे मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांचा यावेळी सर्व संपादकांच्या वतीने शाल, श्रीफळ व वृक्ष देवून सत्कार करण्यात आला. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment