तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 July 2018

जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला लोकप्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

कुटुंबांमधील नातेसंबंधात लोकशाही मूल्ये रुजण्याची आवश्यकता आनंद पवार यांचे प्रतिपादन....

शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द

यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद येथे दि 10 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत सम्यक पुणे, एशिया सेफ ऑबाॅर्शन पार्टनरशिप व जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगभाव समानता, लिंगनिदान व सुरक्षित गर्भपात या विषयांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती महिला लोकप्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. आरती सिंह पोलिस अधिक्षक, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनजिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद पवार कार्यकारी संचालक संम्यक पुणे होते. कुसुम लोहकरे सभापती व जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांची प्रमुख उपस्थितीथी होती.
यावेळी बोलताना आनंद पवार म्हणाले, लिंगभाव समानता, लिंगनिदान व सुरक्षित गर्भपात, पितृसत्ता, लैंगिक व प्रजनन आरोग्य हक्क, स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? पुरुषांसोबत समानतेविषयक सातत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे यावेळी मांडण्यात आली. मुळात विषमता, समानता, समता, हिंसाचार ही भाषाच पुरुषांच्या रोजच्या जगण्याची किंवा चर्चेची नसल्याचे दिसून येते अणि अशी भाषाच जेव्हा स्थापित नसते तेव्हा त्या विषयांबाबतचे चिंतन आपल्या कुटुंबात लोकशाही रुजत नाही. लोकशाही मूल्ये, भारतीय राज्यघटना या विषयी आपल्या कुटुंबीयांशी कधी चर्चा केली आहे का? जर आपण असे बोललो नसू तर त्याचा अर्थ आहे की आपल्या कुटुंबात भारतीय राज्यघटना हा विषय आपण केवळ संसदीय राजकारणाचा समजतो. मात्र कुटुंबांमधील नातेसंबंधात लोकशाही मूल्ये रुजण्याची शक्यता त्यामुळे दुरावताना दिसते. कुठल्याही विषयाची व्यापक चर्चा झाली पाहिजे.
लैंगिकता शिक्षणाचे योग्य वय कोणते यावर खल करणाऱ्या समाजाने, तज्ज्ञांनी व शासन यंत्रणेने स्त्री-पुरुष समानता, लैंगिकता, पुरुषत्वाच्या घातक धारणा, प्रेम व्यक्त करण्याच्या – स्वीकारण्याच्या – नाकारण्याच्या अहिंसक सकारात्मक पद्धती या विषयांच्या शिक्षणाचे गांभीर्य ओळखून पुरुषांना व त्यांच्या मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवून समानता शिक्षणाचे धडे हरतऱ्हेने व मार्गाने दिले पाहिजेत.
अर्थातच असे प्रयत्न करणे केवळ शासनाची जबाबदारी न ठरवता पालक, कुटुंबातील इतर सदस्य व समाजातील विविध संस्थांनीही यात पुढाकार घेतला पाहिजे. पुरुषी वर्चस्वाचे धडे मुलांना त्यांच्या लगेचच्या वातावरणात, म्हणजेच कुटुंबात व समाजात मिळत असतात. ‘तू स्त्रीपेक्षा जास्त महत्त्वाचा व श्रेष्ठ आहेस’ असं त्याला कुणी सांगत नाही, पण भावकी- गावकीतून त्याला हा संदेश आपसूकच मिळत जातो हे ओळखून गावकी-भावकीचा व्यवहारच समानतेवर आधारलेला झाला पाहिजे.
मुली आणि स्त्रियांना त्यांच्या हक्काची सुरक्षितता हा निकषही अग्रक्रमाने लावला पाहिजे. आमच्या गावात एकाही स्त्रीला भेदभाव सहन करावा लागणार नाही अथवा हिंसा केली जाणार नाही असे प्रयत्न आपल्या माध्यमातून झाले पाहिजेत.

यावेळी डॉ. आरती सिंह म्हणाल्या, सध्या गर्भलिंग निदान थांबले पाहिजेत परंतु स्त्री जातीचे अर्भक बेवारस ठिकाणी सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जानजाग्रुती होणे गरजेचे आहे.

यावेळी अध्यक्षीय भाषणात देवयाणी डोणगावकर म्हणाल्या, समाज म्हणून आपणही मुली व स्त्रियांवर होणाऱ्या इतर सर्व प्रकारच्या भेदभावाला व हिंसाचाराला ‘किरकोळ’ अथवा ‘चालायचंच’ या श्रेणीमध्ये गृहीत धरतो. खरे पाहता मुली व स्त्रियांबद्दल भेदभाव व्यक्त करणारी, त्यांचे मानवी अवमूल्यन करणारी, त्यांची प्रतिष्ठा घालवणारी, त्यांच्या समान हक्कांचे उल्लंघन करणारी व त्यांना दुय्यम लेखणारी खासगी अथवा सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घटना ही तितकीच निषेधार्य मानली पाहिजे.
या कार्यशाळेला जिल्हा भरातून जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या महीला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद महिला कर्मचारी तसेच सम्यक संस्थेचे प्रकल्प समन्वयक शिरीष वाघमारे, मुक्ती साधना, संदिप आखाडे, शेषराव इगंळे, सुनिल लोहवे यांनी प्रयत्न केले

No comments:

Post a Comment