तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

'आधार महोत्सव'च्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक! सर्वांनी उपस्थित राहावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12
     राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजितदादा पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या यशस्वीते साठी पूर्वतयारी आढावा घेण्याबाबत आज दि. १३  रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
     राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजितदादा पवार यांचा २२ जुलै तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे  यांचा १५ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने परळीत आधार महोत्सव १५ ते २२ जुलै या कालावधीत 'आधार महोत्सव' साजरा करून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वपदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयात आज शुक्रवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. या या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी केले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment