तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

सिद्धार्थ उद्यानात चाकूचा धाक दाखवून लुटले


मित्रासह सिद्धार्थ उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या चार तरुणांना तडीपार गुंड अश्फाक ऊर्फ बप्पा व त्याच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून चार मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चेन असा ऐवज हिसकावून पळ काढला. क्रांतीचौक डीबी पथकाने अवघ्या काही तासांत गुन्हा उघड करून दोन जणांना अटक केली. दोघांनी धाक दाखवून लुटल्याची कबुलीही दिली. परभणी येथील ज्ञानेश्वर दिगंबर पितळे याची संभाजीनगरात टायपिंगची परीक्षा असल्याने तो सहा मित्रांसह संभाजीनगरात आला होता. सहाजण हे बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये थांबलेहोते. शनिवारी सायंकाळी ज्ञानेश्वर पितळे हा त्याच्या चार मित्रांसह सिद्धार्थ उद्यानात गेला असता त्या ठिकाणी चार जणांच्या टोळक्याने चौघांना चाकूचा धाक दाखवून चार मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चेन हिसकावून पळ काढला.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास पवार यांच्या पथकाने चोरट्यांचे स्केच तयार केले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखवले असता ज्ञानेश्वर पितळे यांनी आरोपींना ओळखले. या टोळीचा मास्टर मार्इंड रईस बोक्याचा भाऊ शेख अश्पाक ऊर्फ बप्पा असल्याचे उघड होताच उपनिरीक्षक कैलास पवार यांनी तात्काळ पडेगाव येथून शेख समीर शेख मुक्तार आणि साहेल एजाज शेख या दोघांना ताब्यात घेतले. शेख समीर शेख मुक्तार आणि साहेल एजाज शेख या दोघांना आज मुख्य न्यायदंडाधिकारी शंकर पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांनी ७ जूलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

No comments:

Post a Comment