तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

परळीभूषण श्रीमती प्रेमीलाबाई गित्ते (तांदळे) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 


संस्कार शाळेच्या मुख्याध्यापीका परळीभूषण श्रीमती प्रेमीलाबाई गित्ते (तांदळे) यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. संस्कार शाळेतील चिमुकल्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा देत अगदी प्रेमाचा वर्षाव केला. सकाळी अगदी अनोख्या पध्दतीने त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेत आल्याबरोबर त्यांना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी फुलांचा गुच्छ देत स्वागत केले.

आज दि.04 जुलै रोजी संस्कार शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती प्रेमीलाबाई गित्ते (तांदळे) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पद्मावती गल्ली येथील संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजीक, शैक्षणीक, राजकीय तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

आज सकाळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका अन्नपूर्णाताई अडेपवार, अनुसयाताई फड,  साहेबराव फड, भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक दहिफळे सर, सुरेश नानवटे,  शंकर कापसे, अनंत इंगळे, धम्मा अवचारे, विष्णू शेंडगे, समाधान भाजीभाकरे, महादेव शिंदे, बंटी सातपुते, मल्हार हाके, नितीन रोडे, महेंद्र रोडे, लखन परळीकर, सुर्यकांत कातकडे, श्रीराम मरळ, मुशिर पठाण, गणेश तांदळे, अक्षय कानडे, अजय निर्मळ, कैलास साळुंके, कपिल लोहार, अविनाश ताल्डे, जानी खान, जावेद कुरेशी आदींची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment