तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 July 2018

शेतकरी पिकविम्या साठी बाजारपेठे सह शाळा,महाविद्यालये बंद

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना पिकविमा मिळावा या साठी परभणी येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू केल्या नंतर त्याला आता जिल्हाभरातून पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसत असून आज पाथरीत व्यापा-यांनी आपापली प्रतिष्ठाणे कडकडीत बंद ठेवली तर शाळा , महाविद्यालयही विद्यार्थ्यां विना ओस पडलेली दिसून आली त्या मुळे शेतक-यांच्या या रास्त मागणी साठी आता जिल्ह्यातील सर्व स्तरातून पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
गत वर्षी खरीपातील पिकविमा मंडळ निहाय निकश धरून देण्या एेवजी काही नेमक्या तालुक्यातील मंडळांना रिलायन्स कंपनी कडून तोकडी विमा रक्कम देण्यात आल्या ने शेतकरी संतप्त असून जिल्हाभरातील पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांना रिलायन्स विमा कंपनी ने तो शेतक-यांना दिला नसल्याने या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा आणि जिल्हाभरातील शेतक-यांना पिक विमा द्यावा या साठी मागिल काही दिवसात पक्ष,संघटना यांनी विविध आंदोलने केली यावनंतर परभणी येथे शेतकरी कृतीसमितीच्या वतीने पिकविमा मिळावा या साठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते या उपोषणाला वाढते पाठबळ मिळतांना दिसुन येत असून बुधवारी शेतक-यां सह सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाअधिकारी यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केल्या नंतर गुरूवारी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने पाथरी संपुर्ण व्यापार पेठ बंद ठेऊन व्यापारी महासंघ शेतक-यांच्या मागणी साठी या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले तर शहरातील शाळा महाविद्यायात ही शुकशुकाट दिसून येत होता. या बंद मुळे जनजिव विस्कळीत झाले होते.बसस्थानकात ही शुकशूकाट दिसून येत होता. आजचा बंद शांतेत पार पडला शासनाने या विषयी निर्णय न घेतल्यास शुक्रवारी शेतकरी कृती समितीच्या वतीने जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment