तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 July 2018

चक्रधरराव ऊगले यांचा पाथरीत सत्कार

प्रतिनिधी

पाथरी:-समता परिषदेच्या परभणी जिल्हाअध्यक्ष पदी सलग पाचव्यांदा निवड झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चक्रधरराव उगले यांचा पंचायत समिती कॉम्पलॅक्स मधील पत्रकार भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या पुर्वी २००२ साली समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी त्यांची पहिल्यांदा निवड केली होती या संघटनेचे काम तळागाळात पोहचवल्या मुळे प्रत्येक तीन वर्षाला होण्या-या निवडी वेळी उगले यांची निवड झाली. शुक्रवारी१३ जुलै रोजी बीड येथे समता परिषदेच्या वतिने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ छगनराव भुजबळ यांच्या स्वाक्षरीने समता परिषदेचे परभणी जिल्हाअध्यक्ष म्हणून सलग पाचव्यांदा निवडीचे पत्र बापूसाहेब भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले चक्रधर उगले यांच्या निवडी मुळे शनिवारी पाथरीत विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला यात पाथरी तालुका पत्रकार संघाच्या वतिने येथील पत्रकार भवन येथे उगले यांचा सत्कार करण्यात आला या वेळी पत्रकार किरण घुंबरे पाटील, पं स सदस्य सदाशिव थोरात, अजय थोरे, माजी पं स सदस्य शिवाजीराव नायकल, मुंजाभाऊ टाकळकर, माजी सरपंच, आसाराम बाराटे ,सुरेंद्र जाधव, गुलाबराव गलबे, हरीभाऊ ऊगले, ज्ञानेबा झोरे, विष्णूपंत काळे, शेख चाँद पाशा यांची या वेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment