तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 July 2018

मंगरुळपीर येथील टंकलेखन परीक्षेत सावळा गोंधळ फुलचंद भगत-मंगरुळपीर

अधिकारी,विद्यार्थी व केंद्रचालकांचे संगनमत
चौकशी करून कारवाईची गरज
मंगरुळपीर ता ४/ येथील जिल्हा परिषद विद्यालयात सध्या टंकलेखन परीक्षा सुरु असून यामध्ये तालुका तसेच जिल्ह्याबाहेरही विद्यार्थी परीक्षा देत आहेत.केंद्र संचालकच विद्यर्थ्यांचे पेपर सोडवित असून जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचा त्यास पाठींबा असल्याने या परीक्षेत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.
तेव्हा याकडे संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच परिक्षा इनकॅमेरा घेवून बैठे पथक नियुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.                          शासकीय नोकरी करीता टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात.परंतु बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांना सराव असल्याने या परीक्षेत टंकलेखन करता येते.परंतु सर्व विद्यार्थ्यांचे पेपर सोडवून उत्तीर्ण करण्याची हमी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचालकाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येते.यासाठी मात्र  इंग्रजी मराठी विषयातील उत्तीर्णची हमी घेऊन विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळण्यात येतात.सध्या मंगरुळपीर येथील केंद्रावर १०४० विद्यार्थी टंकलेखन परीक्षा देत असून यामध्ये बाहेरील तालुक्यासह बाहेरील जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात भरणा आहे.
याचप्रमाणे टंकलेखन संस्थाचालक स्वतः विद्यार्थ्यांचे पेपर सोडवित असून पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील जबाबदार असलेले केंद्रचालक मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे विद्यार्थी,शिक्षण विभागाचे अधिकारी व टंकलेखन संस्थाचालक यांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरु असून जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,व शिक्षण अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.

                 
या परीक्षेत परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासल्यास अनेक जण बाहेर गावातील असल्याचे स्पस्ट होईल.तसेच ज्यांनी परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा टंकलेखन करायला लावल्यास येते का? हे पाहिल्यास या परीक्षेतील गौडबंगाल बाहेर येईल.तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

1 comment: