तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

अंधेरी दुर्घटनेत सात जखमी, काँग्रेस नेत्याने वाहिली श्रद्धांजली.


अंधेरी आणि विले पार्ले स्थानकादरम्यान पुलाचा काही भाग पडल्याने सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. यातील दोन जण गंभीर असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही मृत्यूमुखी पडलेले नाहीये, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी जे कोणी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असतील त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यास ईश्वर मदत करो अशी प्रार्थना केली आहे.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गोखले पुलाचा पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला भाग कोसळला. सहाही मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने आणि ढिगारा ट्रॅकवरच कोसळल्याने अंधेरीहून होणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. पूल कोसळत असताना त्यावरून जाणारे पादचारी हे देखील खाली पडले आणि ढिगाऱ्याखाली दबले, ज्यामुळे ते जखमी झाले आहेत.

No comments:

Post a Comment