तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 July 2018

राष्ट्रपतीं तर्फे राकेश सिन्हा, सोनल मानसिंह यांच्यासह चौघांची राज्यसभेवर नियुक्ती.


___________________________________

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा,शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे. सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून एकाही प्रसिद्ध चेहेऱ्याला संधी मिळालेली नाही ही बाब महत्त्वाची आहे. कारण अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीवरून बरीच टीका आणि चर्चा झाली होती. त्यामुळे सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही असे समजते आहे.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवड केलेले चारही लोक हे आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चौघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते आहे. राम शकल हे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी समाजातील दलित आणि मागासवर्गीय घटकांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. राकेश सिन्हा हे संघ विचारांचे आहेत, भाजपाची विचारसरणी काय आहे हे ते विविध कार्यक्रमांमध्ये मांडत असतात. तसेच दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणूनही काम करतात. सोनल मानसिंग या क्लासिकल डान्सर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. रघुनाथ महापात्रा हे ओदिशाचे आहेत, जगन्नाथ मंदिरासंबंधी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.

No comments:

Post a Comment