तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 July 2018

सारोळा येथिल डांबरी रस्त्यावर काळी माती मिश्रीत मुरूम टाकला

गाड्यांची घसरगुंडी;वाहतुकीला अडथळा
प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील ग्रामिण भागाततील रस्त्यांची सर्वत्र दैना पहायला मिळते वर्षानुवर्ष या रस्त्यावरू कसरत करत ग्रामिण भागातील नागरीक, शाळाकरी मुले,आबाल वृद्ध, आजारी रुग्न जमेल तसा प्रवास करत तालुक्याच्या ठिकाणी येतात अशातच ग्रामस्थांनी महत प्रयास करून नविन रस्ता अथवा डागडूजी साठी संबंधित विभागा कडून निधी मिळवला तर या निधिचा पुढारी कसा गैर फायदा घेऊन नागरीकांना समस्येच्या गर्तेत खोलवर ढकलून स्वत:ची पोळी भाजुन घेतात याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील सारोळा बु. येथे पहावयास मिळेते येथील गणेश नगर ते सारोळा बु. गावा पर्यंतच्या डांबरी रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने चक्क डागडूजी करण्या एैवजी काळी माती मिश्रित मुरून अंथरून कहर केला असून आता दर दिवशी पडणा-या पावसाच्या सरीं मुळे या रस्त्या वरून वाहने घसरून पडत असल्याच्या घटना आणि मोटार सायकलींचे मटगार्ड चिखलाने भरून जात असल्याने या दोन्ही गावचे ग्रामस्थ हवालदिल झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पाथरी तालुक्यातील सारोळा बु. या गावची लोकसंख्या दोन अडीच हजार सांगीतली जाते या गावला पाथरीहून जाण्या साठी काही वर्षा पुर्वी डांबरी रस्ता झालेला आहे. टाकळगव्हाण चौफुली रस्त्या वरून सारोळा बु. गावाकडे जाणा-या रस्त्याचे अंतर  साधारण पणे तीन किमी असून या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडून रस्ता खराब झाल्याने किमान या रस्त्याची डागडूजी करावी अशी ग्रामस्थांची गेली काही वर्षा पासून ची मागणी होती, जि पच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडे हा रस्ता असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या अंतरा मध्ये सारोळा गावापासुन अर्धा किमी अंतरावर गणेश वस्ती असून या दोन गावच्या मधील रस्त्या वरचे खड्डे भरण्या साठी जि प कडून काही निधी उपलब्ध झाला होता असे या गावचे ग्रामस्थ सांगतात मात्र संबंधीत ठेकेदाराने या ठिकाणच्या डांबरी रस्त्यावर चक्क काळी माती मिश्रित मुरूम टाकून या ठिकाणाहून येजा करणा-या ग्रामस्थां पुढे नविनच संकट अभे केले असून मागिल काही दिवसा पासून पावसाच्या सरी पडत असल्याने या रस्त्यावरून ये जा करणे मुश्कील झाले आहे मेटार सायकलिंच्या मडगार्ड मध्ये चिखल अडकून त्या घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून रस्त्यावर पडल्याने नागरीक जखमी होण्याच्या घटना ही दरदिवशी घडत असल्याचे सांगितले जात आहे सारोळा ते गणेश वस्ती या अर्धा किमी अंतरात माती मिश्रित मुरूम टाकून हा डांबर रस्ता खराब करण्यात आला असून त्याचा वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे या कडे संबंधितांनी त्वरीत लक्ष घालून हा रस्ता पुन्हा डांबरी करणाने खड्डे भरून द्यावे अन्यथा येथिल ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment