तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 July 2018

शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजपा सरकारने केले-प्रा.टी.पी.मुंडे

महादेव गित्ते
---------------------------------
परळी वैजनाथ, दि.12
जातीयवादी व धर्मवादी आर.एस.एस.च्या इशार्‍याने चलणार्‍या भाजपाच्या केंद्र सरकारने
शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असल्याची घणाघाती टिका अखिल भारतीय कॉंग्रेसचे राष्ट ्रीय
सदस्य तथा महाराष्ट ्र प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केली. परळी मतदार संघातील भतानवाडी
येथील कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या शाखा उद२घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते नागनाथराव भताने हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ नेते
जनार्धन गाढे गुरूजी, तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे
उपसभापती प्रा.विजय मुंडे, अनिल मस्के, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, एकतावादी रिपाईचे
पंडीत झिंजुर्डे, जि.प.सदस्य प्रदिपभैय्या मुंडे, श्रीमंत कांगणे, भैय्या मुरकुटे आदी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना प्रा.टी.पी.मुंडे (सर) पुढे म्हणाले की, देशात भाजपाचे जातीयवादी सरकार
अपघाताने सत्तेवर आले आहे. देशाची सत्ता हातात येताच भाजपाच्या व आर.एस.एस.च्या नेत्यांनी देशातील शेतकरी व बहुजनावर सुड उगवण्याचा प्रयत्न चालविला त्यातुनच वेगवेगळे जातीयवादी कायदे करून व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत बदल करून शेतकरी, शेतमजुर, दलित, अल्पसंख्याक, बहुजन, व्यापारी यांच्यावर अन्याय करून भांडवलदारी मोठ्या उद्योजकांचे हित जोपासण्याचे पाप हे सरकार करीत आहे. भाजपा सरकारच्या या दुष्कृत्यापासुन सामान्य जनतेने व शेतकर्‍यांनी आता तरी धडा घ्यावा व जातीयवादी भाजपा पासुन सावध रहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लक्ष्मणराव भताने यांची अंबाजोगाई कॉंग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केली. यावेळी उपस्थितांचे स्वागत शाखाध्यक्ष गोपाळ भताने, उपाध्यक्ष संभाजी भताने, सचिव अशोक लिंबाजी भताने, सहसचिव महारूद्र भताने, कोषाध्यक्ष महेश भताने, युवक कॉंग्रेसचे शाखाध्यक्ष पांडुरंग भताने, उपाध्यक्ष राजाभाऊ भताने, आनंत भताने, सचिव विष्णु भताने, सहसचिव गंगाधर भताने, कोषाध्यक्ष अमोल भताने, सल्लागार लक्ष्मण भताने, हनुमंत भताने, ज्ञानोबा भताने, सुरज भताने, विकास भताने, भागवत भताने, लिंबाजी भताने, श्रीमंत भताने, विठ्ठल भताने, सचिन भताने, प्रताप भताने, अमोल भताने, विजय भताने, वैजनाथ भताने, तुकाराम भताने, उत्तम भताने, रघुनाथ कांबळे, अनिल मस्के, बळीराम कांबळे, नागनाथ कांबळे, राम केंद्रे, तुकाराम भगवान भताने, सोमनाथ होलबोले,
निळकंठ भताने आदी सह असंख्य गावकरी उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment