तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

जन्मभूमी फाऊंडेशनची युपीएसीच्या विद्यार्थ्याला आर्थीक मदत

प्रतिनिधी

पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशन संकटातील गरजू आणि गरीब शेतकरी कुटूंबा ला नेहमीच मदत करत आले असून सोमवारी तालुक्यातील सारोळा खु. येथील शेतक-याच्या मुलाला युपीएसीची तयारी करण्या साठी आर्थीक मदत केली.
सारोळा खु.येथील आशोक गंगाराम आव्हाड या विद्यार्थ्यांने मानवत येथील केकेएम महाविद्यालयात बीसीए पुर्ण केल्या नंतर औरंगाबाद येथील एका खाजगी अॅकादमीत प्रवेश मिळवलायेथे भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात काही काळ काढल्या नंतर, आता  नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन मध्ये तो युपीएसी ची तयारी करत आहे या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती अतिषय बेताची असून या विद्यार्थ्याला जन्मभूमी फाऊंडेशन कडून आज पाच हजार रूपयांची रोख आर्थिक मदत माजी आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या हस्ते दिली. या वेळी जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी या विद्यार्थ्याच्या परिस्थितीची माहीती माजी आ दुर्रांनी यांना दिली त्यांनीही या विद्यार्थ्याला योग्यती सर्व अर्थीक मदत करण्याचा शब्द दिला या वेळी खेर्डा गावचे माजी सरपंच अविनाश आमले यांची उपस्थीती होती या वेळी आशेक आव्हाड यांनी जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात ,सचिव किरण घुंबरे पाटील आणि सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment