तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 July 2018

संभाजी ब्रिगेड च्या संवाद दौऱ्यास उपस्थित राहन्याचे आवाहन


फुलचंद भगत
मंगरुळपीर:- रविवार 15 जुलै रोजी होणाऱ्या संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्ता संवाद दौऱ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सचिन उर्फ बाळा मांढरे यांनी केले आहे.
  संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष सचिन मांढरे यांनी दिलेल्या पत्रकानुसार वाशिम जिल्ह्यात रविवार 15 जुलै रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड विविध क्षेत्रात कार्यरत आहे त्यामद्धे  सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रात संभाजी ब्रिगेड ने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. बहुजन समाजाला दिशा देणारी संघटना म्हणून ओळखली जाते. संभाजी ब्रिगेडने संकल्प अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घेतली आहे. शेतमालाला हमीभाव, दारूमुक्ती, अपंग, निराधार, बेरोजगार, शेतकरी व शेतमजूर यांच्या  विविध प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड नियोजनबद्ध रित्या कार्य करीत असून या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड सशक्त धोरण आखत आहे. बहुजन व समाजातील वंचित घटकांचा आधारवड होण्याचा बहुमान संभाजी ब्रिगेड ला मिळणार आहे.
त्यादृष्टीने संभाजी ब्रिगेड ची जनतेच्या हितासाठी असलेली भूमिका व कार्यकर्त्यांचे योगदान यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने रविवार 15 जुलै 2018 रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने वाशिम जिल्ह्यात संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या संवाद दौऱ्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष सचिन उर्फ बाळा मांढरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावंडे, संतोष गांजरे, संदीप कडूकार, मनोज काटकर, प्रतीक धोपटे, अमित रघुवंशी, ऋषिकेश शिंदे, अनुप गहुले, सचिन जाधव, भरत बुधे, उमेश मिसाळ, राजेश सावध, कान्हा खोडके, शिवा परंडे यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment