तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

प्रामाणिकता आणि एकनिष्ठता या मुळेच आमदारकी मिळाली-आ दुर्रांनी

किरण घुंबरे पाटील

पाथरी:- खा पवार साहेबांचा शब्द आपण पाळला गेली पस्तिस वर्ष साहेबां सोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहील्याची आजची गोड फळे असून आमदरां मधून आमदार होणे हे दिग्गजांनाच भाग्य लाभते पण आपण दिग्गज नसतांनाही पवार साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केल्यानेच पक्षाने मला पुन्हा संधी दिली त्या संधीचा फायदा घेत तालुक्या सह जिल्हाभरातील शेतकरी, उद्योगधंदे, वाढऊन तरूनांना रोजगार उपलब्ध करून देण्या साठी या पुढे काम करणार असल्याचे प्रतिपादन आ दुर्रांनी यांनी त्यांच्या जंगी मिरवणूकी नंतर कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना व्यक्त केले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमा साठी सारंगधर महाराज, मुंजाजी भाले पाटील, सुभाषराव कोल्हे, अनिलराव नखाते, आशोकराव गिराम, दादासाहेब टेंगसे, मुजाहेद खान ,माधवराव जोगदंड, चक्रधरराव उगले, संदिप माटेगावकर,नितेश भोरे, हन्नान खान दुर्रांनी, तबरेज दादा दुर्रांनी, तारेख खान दुर्रांनी, शाकेर सिद्धीकी यांच्या सह न प चे सर्व नगरसेवक, पं सं जि प सदस्य आणि राकाँ पदाधिकारी यांची उपपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले की केवळ प्रामाणिक पणा आणि निष्ठा या सोबतच जिल्हाभरातील पक्ष संघटन आणि विकास या सर्व कारणां मुळे मला पक्षाने पुन्हा आमदारकी दिली आता या सहा वर्षात पुन्हा जोमाने कामवकरून पाथरी मानवत सह जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते या वेळी म्हणाले. येत्या काळात पाथरी शहरातील सर्व रस्ते, आणि शेतक-यां चे उत्पन्न वाढवण्या साठी भाजी मार्केटची उभारणी पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असून शेतक-यांचा भाजीपाला थेट मुंबई पुणे येथे आणि तेथील माल पाथरीत विक्री होण्या साठीचे केंद्र उभे करण्याचा आपला माणस असून या मुळे शेतक-यांना मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. येत्या सहा वर्षात जास्तित जास्त तरूनांना रोजगार  मिळून देण्या बरोबरच ओबीसींच्या प्रश्नां साठी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत संधी गेल्यावर ही प्रामाणिक पणे काँग्रेस उमेदवाराचे काम केले त्यांना लागेल ती मदत देण्या साठी तयार होतो पण ते शेवटच्या तीन दिवसात फोन बंद करून बसले त्यामुळेच ते पराभूत झाले असे ते म्हणाले या मुळे दोन जागा कमी झाल्याने आमचं संख्याबळ कमी झाल्याची खंत आ दुर्रांनी यांनी या वेळी व्यक्त करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील, विधानसभेचे गट नेते अजितदादा पवार, खा सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर जे प्रेम केलं विश्वास दाखवला त्या बद्दल त्यांचे खास आभार मानले या वेळी थोडे भाऊक होत त्यांनी पाथरीकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले त्याचीच फळे आज मिळत असून जनतेच्या प्रेमा मुळेच आज पाथरी शहरा सह तालुक्याचे  नाव विधिमंडळात गाजत असल्याचे ते म्हणाले.पुढे बोलतांना ते म्हणाले की केवळ प्रामाणिक पणा आणि निष्ठा या सोबतच जिल्हाभरातील पक्ष संघटन आणि विकास या सर्व कारणां मुळे मला पक्षाने पुन्हा आमदारकी दिली आता या सहा वर्षात पुन्हा जोमाने कामवकरून पाथरी मानवत सह जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते या वेळी म्हणाले. येत्या काळात सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहून परभणीचे खासदार आणि चार आमदार निवडून द्यावे असे आवाहन केले. तत्पुर्वी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि पदाधिकारी यांनी आ दुर्रांनी यांचा सत्कार केला या नंतर राकाँचे प्रवक्ता सेल चे जिल्हाध्यक्ष संदिप माटेगांंवकर, माधवराव जोगदंड, मुजाहिद खान, सारंगधर महाराज यांनी मनेगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचलन कृऊबासचे उपसभापती तथा राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे यांनी केले कार्यक्रमा साठी हजारोच्या संखेने राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment