तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 July 2018

परळीत चौदाव्या दिवशी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन चालुच नाशिक, सिन्नर, पुण्यातील कार्यकर्त्यांनी घेतली आंदोलकांची भेट


परळी दि.31
    मराठा समाजाला आरक्षण द्यावे व शासनाची मेगा भरती रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने येथील तहसील कार्यालय समोर दि.18 जुलै पासुन सुरु असलेले ठिय्या आंदोलन चौदाव्या दिवशीही चालुच होते. मंगळवारी दुपारी नाशिकचे माजी आमदार  अ‍ॅड.माणिकराव कोकाटे यांनी  आंदोलनास भेट देऊन जाहिर पाठिंबा दिला आहे.  यावेळी त्यांच्या सोबत नाशिक, सिन्नर येथील कार्यकर्ते होते. तसेच पुणे जिल्ह्यातुनही कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
    मंगळवारी दुपारी चार च्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आंदोलन स्थळी भाषणे चालुच होती.  मंडप असल्याने  पावसाचा तेवढा  परिणाम झाला नाही. परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार शरद झाडके आज दुपारी आंदोलन स्थळी जावुन आंदोलकांशी चर्चा केली. व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जोपर्यंत आरक्षण जाहिर होत नाही. व मेगा भरती रद्द केली जात नाही. तोपर्यंत आंदोलन चालुच राहील. असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
    पुण्याचे आबासाहेब पाटील हे चौदा दिवसापासुन परळीच्या तहसील समोरील ठिय्या आंदोलनात सहभागी असुन आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या सोबत महेश डोंगरे (सोलापुर), विवेकानंद बाबर (सातारा), संजय सावंत (औरंगाबाद), सुनिल नागणे, (तुळजापुर) व परळी येथील मराठा समाजातील तरुण, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. कांहीजण आंदोलन स्थळीच मुक्काम करीत आहेत. याठिकाणी दोन टाईम जेवणाची व्यवस्था परळीतील समाजबांधवाकडुन करण्यात आलेली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आहे.
    तहसील परिसरात हे ठिय्या आंदोलन दि.18 जुलै पासुन चालु आहे. तेव्हांपासुन अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोराडे, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड हे तळ ठोकुन आहेत. तसेच चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परळी शहरात शांततेत ठिय्या आंदोलन चालु आहे.
    पुणे जिल्ह्यातील चाकण येथे सोमवारी आरक्षण प्रश्‍नी हिंसक वळण लागले. आंदोलनानंतर कांहीजणांनी एस.टी. व खाजगी बसेस तसेच शिवशाहीच्या बसेसची जाळपोळ केली. याबद्दल मराठा ठोक मोर्चाचे राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील चिंता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरु केलेल्या शिवशाही बसची केलीली जाळपोळ ही आंदोलकांनी केली नसुन त्यां पाठीमागलचे आरोपी दुसरेच असावेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली. तसेच आंदोलनाची दिशा परळीतुन ठरलेली असल्याने परळीशी संपर्क साधावा नंतरच आंदोलन करावे असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाप्रश्‍नी ठोस निर्णय त्वरीत घ्यावा, विशेष अधिवेशन शासनाने बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली.
   
      ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment