तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 14 July 2018

राजकीय कुरुक्षेत्रावरील संघर्षशील नेतृत्त : मा. धनंजय मुंडे

राज्याच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील एक संघर्षशील नेतृत्त्व म्हणजे मा.धनंजय मुंडे. उत्कृष्ट संघटन, कार्यक्षमता आणि रोखठोक वक्तृत्व या त्यांच्या शैलींचा समाजावर चांगलाच प्रभाव पडलेला पाहायला मिळतो आणि यामुळेच आज महाराष्ट्राच्या  कानाकोपर्यात धनंजय मुंडे हे नाव चर्चेत पाहायला मिळते.

राज्याच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील एक संघर्षशील नेतृत्त्व म्हणजे मा.धनंजय मुंडे. उत्कृष्ट संघटन, कार्यक्षमता आणि रोखठोक वक्तृत्व या त्यांच्या शैलींचा समाजावर चांगलाच प्रभाव पडलेला पाहायला मिळतो आणि यामुळेच आज महाराष्ट्राच्या  कानाकोपर्यात धनंजय मुंडे हे नाव चर्चेत पाहायला मिळते.
ऊसतोड कामगारांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा राजकीय वरसाही लाभलेला आहे. बीड जिल्ह्याच्या या पवित्र मातीने शैक्षणिक ,अध्यात्मिक, सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील कित्येक महानविभूत्यांना जन्म दिला आहे. पैकी राजकीय चौकटीत राहून समाजाच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असलेले नेतृत्त्व म्हणजे लोकनेते मा.गोपीनाथरावजी मुंडे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याला त्यांनी राजकीय वर्तुळात महत्वाचं स्थान दिले आणि जिल्ह्यातील जनतेला यौग्य न्याय दिला. हिच कटीबद्धता आज धनंजय मुंडे यांच्या मध्ये पाहायला मिळते, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच धनंजय मुंडे यांच प्रत्येक पाऊल हे जनतेच्या हक्काकडे धाव घेत असल्याच पाहायला मिळत. मा.आ. धनंजय मुंडे यांचा जन्म प्रभू वैद्यानाथाच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या नाथ्रा या गावी १५ जुलै १९७५ रोजी झाला लहानपणापासूनच अतिशय हुशार, चपळ, बोलके, आणि ध्येयवेढे  असलेल्या धनंजयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, व पुढील विद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ विद्यालय परळी येथे झाले व  पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनचा प्रतिनिधीत्वपणा आणि लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू त्यानां राजकारणाकडे घेऊन आले.भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि शेवटी अध्यक्ष अश्या संघटनेटल्या प्रत्येक पदांवर काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवत कर्तृत्व सिद्ध केले. याचप्रमाणे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य , उपाध्यक्ष, आणि त्यानंतर विधानपरिषद सदस्य अशी यशाची प्रत्येक पायरी चढत त्यांनी लहान- मोठ्या अनुभवाची मजबूत इमारत तयार केली.उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि कणखर वकृतत्व या भांडवलाच्या जोरावर त्यांनी या काळात "युवकांचा धनुष्य" स्वतः च्या आणि पक्षाच्या हाती दिला.
       राजकीय रणांगणात काका(मा.ना.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे) यांच्यासमवेत झालेला संघर्ष ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना असावी. कारण जो मनुष्य जीवनातला आदर्श होता, ज्यांच्यावर देवपेक्षाही आपर श्रद्धा होती त्या माणसापासून स्वातंत्र्य होताना कुठलाही युवक मोडून पडला असता परंतु समोरील परिस्तिथीला न डगमगता समोरची दरी पार करत नव्या जीवनाची नव्या मार्गाने सुरुवात केली.......राजकारणातील जानता राजा मा.ना शरदचंद्रजी पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यातील कौशल्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये सामावून घेतले व विधान परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेते ही पदे बहाल केली. आपल्या कर्तृत्वाने सभागृहात पुराव्यासह कित्येक घोटाळे उघडकीस आणत सत्ताधार्यांच्या  तोंडावरची झोप उडवली, तर कर्तुत्वाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करणार्यांना, तुम लाख कोशीश कर लो मुझे बदनाम करने की |
मै जब-जब बिखरा हूं दुगुणी रफ्तार से निखारा हूं || असे सडेतोड उत्तर दिले, वक्तृत्वाचा वारसा लाभलेल्या धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल सभेतून दिवसाचे पंधरा पंधरा तास काम करत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.  सत्तेत नसतानाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या, रस्ते, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आधुनिक शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, घरकुल योजना, वीज प्रश्न, पाणी प्रश्न, शाळा इ समस्यावर लक्ष देऊन समस्यांचे निवारण केले, तर नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो बहिणींनिंचे कुटुंब प्रकाशमय केले. जनतेच्या कल्याणासाठी संघर्ष करून पक्षामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम मा. धनंजय मुंडे यांनी केले आहे
         धनंजय मुंडे साहेबांसारखे सक्षम नेतृत्व असल्याशिवाय समाजजीवनात, प्रशासनात परिवर्तन होऊच शकत नाही. ‘योगः कर्मसु कौशलम्’ ही योगाची व्याख्या श्रीकृष्णाने केली आहे. कर्म कौशल्याने करण्याकरिता मन, मेंदू आणि हृदय एकाग्रतेने वापरावे लागते. फक्त आदेश देणे, वरच्या सूचना खाली पाहोचविणे या करिता फार क्षमतेची गरज नसते. जो चांगली माणसं तयार करू शकतो, तोच खरा नेता असतो. शिवाजी महाराज प्रत्यक्ष सैन्यासोबत स्वतः लढत होते. म्हणूनच ते यशस्वी झाले आणि जिवाला जीव देणारी माणसे तयार केली. आज आपला देश नवी झेप घेण्याकरिता सिद्ध होतोय. अशा वेळी धनंजय मुंडे साहेब यांच्यासारखे सर्वत्र क्षमतावान नेतृत्व युवकांच्या पाठीमागे ऊभा राहत तेव्हा पुढे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं बळ हत्तीच्या बाळागत वाढते. आसा नेता बीड जिल्ह्यात जन्माला आला हे खरं तर बीड जिल्ह्याचं भाग्य म्हणायला वावग ठरणार नाही.......!
         बीड जिल्ह्यातील तमाम जनतेकडून मा.ना धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......!

अर्जुनकुमार फड
मु.पो धर्मापुरी ता.परळी वै
मो. ९९२१३८१००५

No comments:

Post a Comment