तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 9 July 2018

शेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलन. राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीचा ईशारा.


संग्रामपुर( प्रतिनिधी) आज  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांच्या मार्फत जळगाव जामोद तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे बँक व्यवस्थापकांनी शेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलनाला सामोरे व्हा असा सज्जड ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
छञपति शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिड लाख रूपये पर्यंत कर्ज माफी झाल्याचे शासनाने जाहीर केले परंतु जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक शेतक-यांना पिक कर्ज देण्यास टाळा टाळ करूण शेतक-यांना आत्महत्तेस प्रवृत्त करण्याच काम बँक व्यवस्थापक करीत आहेत. वास्तहिक पाहता 1/8/2017 नंतरचे व्याज शेतक-याकडून घेऊ नये असे शासनाचे आदेश असतांनाहि बँकेचे अधिकारी माञ शेतक-यांना वेठिस धरूण व्याजाची वसुली करीत आहेत. तसेच कर्ज माफी झालेल्या शेतक-यांना तात्काळ पिक कर्ज देणे अपेक्षीत असंताना  व्यवस्थापक स्वत:चे मनमानी नियम लावून शेतक-यांना पिक कर्ज देण्यास टाळा टाळ करीत असल्यामूळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. त्या करीता बँक व्यवस्थापकांनी शेतक-यांना नाहक ञास देणे बंद करूण नको ते कागद पञ शेतक-यांना न मागता पिक कर्ज वाटप करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तूवात शेकडो शेतक-यांना सोबत घेऊन बँक व्यवस्थापकांना धडा शिकवण्यासाठी ऊग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनावर स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रोशन देशमुख, अजय वानखडे,सैययद बाहोद्दिन,एकनाथ गायकी, विठ्ठल पाटील, बसीमोद्दिन कलिमोद्दिन, प्रल्हाद मानकर, प्रल्हाद गवळी, न्यानेश पाटिल, दिपक बोराखडे, पी. एस. अंबडकार, हरीदास ईदोंरे, वसंता वानखडे सह असंख्य शेतकरी उपस्तिथ होते

No comments:

Post a Comment