तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 July 2018

शिक्षक नेते श्रीराम आघाव यांचे अपघाती निधन

 

प्रतिनिधी
बीड-  कास्ट्रईब संघटनेचे नेते श्रीराम आघाव यांचे आज 8 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले दुपारी 1 वाजता त्यांच्यात पार्थिवावर जन्म गावी वंजारवाडी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.                                 शिक्षक नेते श्रीराम आघाव यांच्या मोटार सायकलला दि 7 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता ट्रकने जबर धडक दिली होती.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचतावर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले मात्र डोक्यास गंभीर मर असल्याने ते यातून वाचू शकले नाहीत.त्यांच्या अपघाती निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली असून एक लढवय्या नेता गेल्याचे दुःख आहे. ते  भाजपानेते सर्जेराव तात्या तांदळे,आणि वैजीनाथ नाना तांदळे,तसेच जगन्नाथ दादा तांदळे यांचे भाच्चे होते. ते कास्ट्राईब कर्मचारी कल्याण  महासंघाचे राज्य अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंतविधी त्यांचं जन्मगावी वंजारवाडी येथे दुपारी 1.00 वाजता होणार आहे.आघाव कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सहभागी आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment