तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 July 2018

जनतेसाठी वाहून घ्या येणारा काळ आपला आहे- ना.धनंजय मुंडे


रळीशहर राष्ट्रवादीची बैठक उत्साहवर्धक !
परळी वैजनाथ /प्रतिनिधी.
    जनतेच्या कामात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सदैव तत्पर राहून काम करा.राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात अग्रगण्य पक्ष म्हणून पुढे येत आहे. वाढता जनाधार आणि विद्यमान सरकारच्या विरुद्ध असलेला जनतेचा रोष या अनुषंगाने येणारा काळ आपला आहे हे लक्षात घेऊन जनतेसाठी वाहून घ्या असे मार्गदर्शन राज्याचे विधान परीषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले. परळीत शहर राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली या बैठकीत ना. धनंजय मुंडे यांनी केलेले मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साहवर्धक ठरले.
          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहर ची महत्त्वपूर्ण बैठक  दि.२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या वेळी ना.धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सरकारच्या विरोधात चांदा ते बांदा लाट आहे. परळीचा राष्ट्रवादीचा गड आणखी मजबूतकरण्यासाठी निर्धार करा. आपण निधी आणतो पण विरोधकांकडून खोडा घालायचे राजकारण सुरु आहे. खा.शरद पवार यांच्या मुळे ५०० कोटीचा सौर ऊर्जा प्रकल्प साकरला. शहराच्या विकासाकरीता सर्वस्व पणाला लावत आहे. सर्वांगीण विकसित शहर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी सर्वांनी एकदिलाने सकारात्मक काम करावे. शहरात आपली खुप मोठी ताकद आहे ही ताकद खऱ्या अर्थाने सेवेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेउन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. रा. काॅ.शहराध्यक्ष बजीराव धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. शहरात वन बुथ 10 यूथ नव्हे तर वन बुथ 50 यूथ ची आपली  ताकद आहे. ना.धनंजय मुंडे हे आपल्या परळीकरांचा अभिमान, अस्मिता व आधार असून त्यांचे कार्यकर्ते म्हणूनअभिमान वाटेल असेच काम सर्वमिळून करण्याचा निर्धार व्यक्त करुन शहरात 51 शाखा आणि बुथ रचना लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        या वेळी रायुकाॅ प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी रा.यु. काॅ. ने तयार केलेल्या एप्लिकेशन बाबत माहिती दिली. बुथ यंत्रणा, बुथ प्रमुख,वन बुथ 15 यूथ रचना सर्वांची अद्यावत माहीती मोबाईल ऍप वर अपलोड करायची असून 15 जुलै ही डेड लाईन असल्याची माहीती दिली. महिला आघाडी बुथरचने मध्ये महत्वाची जबाबदारी स्विकारणार असून शहरात महिला आघाडी च्या शाखा लवकरच निर्माण होतील अशी ग्वाही शहराध्यक्षा अर्चना रोडे यांनी दिली.
सूत्र संचलन प्रा.डॉ.विनोद जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन शहर सरचिटणीस  अनंत इंगळे यांनी केले.
    यावेळी जि.प.सदस्य अजय मुंडे, उपनगराध्यक्ष अय्युब पठाण,जिल्हा नियोजन समीती सदस्य चंदुलाल बियाणी, प्रा.डॉ. विनोद जगतकर,अब्दुल बाशीत भाई,गटनेते वाल्मीक अण्णा कराड, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख,जाबेर खान पठाण, शरद मुंडे, सौ. निलाबाई रोडे, राजाखान पठाण, शकील कुरैशी, जयपाल लाहोटी, वैजनाथ बागवाले,श्रीकांत ढेले,सुभाषबाबु वाघमारे, अझिझ कच्छी, अनवर मिस्कीन, किशोर पारधे, गोंविंद मुंडे,बालाजी चाटे,पांडुरंग गायकवाड, केशव भाऊ बळवंत, विजय भोयटे, श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे, शरीफ भाई, किशोर केंद्रे,चेतन सौंदळे, सौ. कमलाबाई कुकर, रज्जाक कच्छी,जयराज देशमुख, शेख शम्मो,शंकर आडेपवार, नितिन रोडे, अनिल अष्टेकर,संजय फड,जयप्रकाश लड्डा, संतोष शिंदे,सय्यद सिराज,अनंत ईंगळे, मेहबूब कुरैशी,दत्ताभाऊ सावंत,अकबर काकर, सौ.अर्चनाताई रोडे, सौ.पल्लवीताई भोयटे, सौ.रेशमाताई गित्ते, सौ.अन्नपूर्णाताई जाधव, सौ.संगीता तुपसागर, सुलभाताई साळवे,लाला खान पठाण,नाझेर हुसैन, के.डी.उपाडे,अजय जोशी,अड.मनजीत सुगरे, सुरेंद्र कावरे,जयदत्त नरवटे, अल्ताफ पठाण, सचिन जोशी, कमलकिशोर सारडा, गफार काकर,महेंद्र रोडे, सतीष देशमुख, दिपक डी.देशमुख,शरद चव्हाण, गजानन गोदाम,सुरेश गित्ते,रमेश मस्के, शंकर वाकडे, शिवाभाउ महाजन, सौ.राधाताई फकीरे,उषा दौण्ड,सौ.वैशालीताई तिड़के,आशा घाडगे, सौ.गोदावरी पोखरकर, सौ.उमा धुमाळ,बेबी तांबोळी, दैवशाला जुगदर, केशव गायकवाड, गोंविंद कुकर,शरद कावरे,अमोल कानडे, विजय पुजारी,रामभाऊ ढेंगळे,अमोल सूर्यवंशी, भारत ताटे, वैजनाथ जोशी, रतन आदोडे, अमर रोडे, अमोल रोडे,सुनील जठार, सोमनाथ सुरवसे,राजाभाऊ स्वामी,रवि मुळे, श्रीहरि कवडेकर, एस.के. शेप, दिलीपराव देशमुख, व्हि. जी. पवार, व्हि.एस. सावजी, जयगावकर,सुरेश नानावटे,रंगनाथ सावजी, अमित दुप्ते,बालाजी वाघ, दिनेश गजमल, सचिन मराठे, धोंडीराम धोत्रे, जावेद कुरैशी, संतोष साळुके, बाबासाहेब गंगाधरे, शंकर कापसे, प्रणव परळीकर, प्रितम जाधव, रवि आघाव, धम्मा अवचारे, अमित केंद्रे,रामदास कराड,बालाजी दहिफले,कृष्णा मिरगे,प्रतीक बद्दर, सतिश गंजेवार,गणेश सुरवसे, मोईन काकर,सय्यद फेरोझ,शेख आझम भाई लिम्बुवाले,गिरीष भोसले,अड.सुरेश शिरसाठ,सय्यद मुश्ताक़,शिवाजी सरवदे, राम कुकर,बालाजी मस्के, शाम कुकर,बाबा सरवदे, राज जगतकर, प्रताप समिंदरसवळे, नरेश सुरवसे, शेख समीर,शेख नय्युम,जावेद इसाककुरैशी, शेख अश्पाक, बाबूराव गव्हाने, शेख यूनुस डिघोळकर, मुख्तार सेठ, सय्यद अल्लाउद्दीन, सय्यद मुसा,अविनाश गवळी, कृष्णा डुबे,मनोज सायकर, उमेश सुरवसे, योगेश नानावटे,बाबा पवार, रवि सोरडगे, विश्वजीत कांबळे,विजय तिडके, राहुल दहीवाळ, दिलीप मगळीकर,लक्ष्मण कलमे, वाजेद पठाण, तक्की खान, अभिजीत शेंद्रे, सय्यद मुस्तफा,शेख हसन,मंगेश मुंडे,विठ्ठल मस्के,महिपाल सावंत, रफीक पटेल,गणेश मस्के, अनिल शिंदे,अस्लम पठाण,सय्यद आरबाज, सुदाम राठोड,शेख चाँदपाशा, तौफीक कच्छी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
  

No comments:

Post a Comment