तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 July 2018

अतिरिक्त शिक्षकांचे तालुक्यातच समायोजन करू मा . कुणाल खेमणार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि .प. कोल्हापूर यांची शिक्षक संघाला ग्वाही


बाळू राऊत / तेज न्यूज़ हेडलाईन्स
मुंबई : कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत  मा. कुणाल खेमणार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी,  मा. सर्जेराव पाटील साहेब, उपाध्यक्ष  मा.आडसूळ साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ), व मा. राजेंद्र भालेराव साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूरयांचे सोबत दिलखुलास चर्चा करणेत आली. त्यावेळी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला पुढील प्रश्नावरण ठोस अश्वासने  मिळाली.
प्रश्न व कार्यवाही
१)बदलीने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुक्यातच समायोजन करावे---
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संघाच्या मागणीप्रमाणे तालुक्यातच केले जाईल. समायोजन करण्यासाठी किमान ७ / ८ दिवस लागतील
२ ) आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सोय त्यांना हव्या असलेल्या तालुक्यातच करावी.----
आम्हाला मान्य आहे त्यांची गैरसोय झाली आहे. परंतू या नेमणूका आमच्या हातात नव्हत्या. तरी सुध्दा आम्हांला अधिकार दिल्यास शिक्षक भरती होण्यापूर्वी त्यांची निश्चितच सोय करू
३ ) दुर्गम भागात गेलेल्या महिलांना सोयीत पुर्नस्थापणा देणेत यावी.
दुर्गम भागात गेलेल्या २७महिला शिक्षकांना सुगम भागात बदलून आदेश देण्याचे मान्य केले
४)सर्व प्रकारच्या पदोन्नती लवकरात लवकर घ्याव्यात---
  न्यायालयीन निकाल लागताच बदल्यांचे वारे थांबले की,१५दिवसांत सर्व प्रकारच्या पदोन्नत्या केल्या जातील
५)शाळेची लाईटबीले ग्रा पं कडील १४व्या वित्त आयोगातून भरावित---
शाळेची लाईटबीले ग्रा पं ना मिळणाय्रा १४व्या वित्त आयोगातून भरण्यासाठी जि प कडून ग्राम पंचायतीना पत्र काढून लाईटबीले ग्रा पं कडून भरण्याचे आदेश देण्याचे मा.आडसूळ साहेबांनी मान्य केले
६)प्रा.फंडाच्या पावत्या त्वरीत मिळाव्यात ज्या तालुक्यांचे फंडात पाठवलेल्या रकमांचे चलन अद्याप आलेली नाहीत त्या तालुक्याच्या ग शि अ ना नोटीस काढण्याचे मा.आडसूळ साहेब प्रभारी शिक्षणाधिकारी तथा डेप्युटी सी ई ओ यांनी मान्य केले
७)शिक्षकांना बी एल ओ कामे देऊ नयेत
   याकामी शासनाच्या जी आर प्रमाणे इतर कर्मचाय्रांची नेमणूक करुन जर गरज असेल तरच शिक्षकांची नेमणूक करावी असे पत्र मा.निवडणूकअधिकारी,जिल्हाधिकारी,तहसिलदार यांना पाठवण्याचे मान्य केले
८)शिक्षकांचे पगार एक तारखेला करावेत
तालुक्यातून पगारबीले मुदतीत पाठवण्यासाठी ग शि अ ना नोटीस पाठविण्याची कार्यवाही करू तसेच शिक्षकांचे पगार झाल्याशिवाय गटशिक्षणअधिकारी व अाॅफिस कर्मचाय्रांचे पगार करणार नाही असे मा.आडसूळसाहेबांनी सांगितले
९)मेडीकल बीले लवकर मंजूर होत नाहीत
  मा.आडसूळ साहेब- मी चार्ज घेतलेपासून एकही मेडीकल बील पेंडींग ठेवलेले नाही
अशाप्रकारे विविध विषयांवर चर्चा करणेत आली.यावेळी समन्वय समितीचे नेते मोहन भोसले मामा,राज्याध्यक्ष राजाराम वरुटे,जिल्हाध्यक्ष संभाजी बापट,शिक्षक बँक चेअरमन शिवाजी पाटील,संचालक--राजमोहन पाटील,बजरंग लगारे,नामदेव रेपे,साहेब शेख,बाजीराव कांबळे,भुदरगड अध्यक्ष-डी डी पाटील ,बी एस पाटील कोनवडेकर,श्रीपती तेली,बी एस् पाटील आकनूरकर,सदानंद पाटील व शिक्षकसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment